Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Khadakwasla Dam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Khadakwasla Dam । पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवारी दुपारी खडकवासला धरणातून २००० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये ज्यांची गाड्या आणि जनावर आहेत, त्या नागरिकांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

खडकवासला धरण ७५ टक्के भरलं- Khadakwasla Dam

पुण्यातील पावसामुळे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) ७५ टक्के भरलं आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण आणि धरणात पाण्याची वाढती आवक बघता धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय आज प्रशासनाने घेतला. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच विसर्ग असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विसर्ग सुरू करण्यापूर्वी जलपूजन केलं गेलं. त्यानंतर हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जवळपास 2 हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला. जर पाऊस असाच सुरु राहीला तर पावसाचा वाढता जोर पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना त्यांची वाहने नदीपात्रातून काढून टाकण्याचे आणि अपघात टाळण्यासाठी नांदेड शहरातील नदीच्या पुलाचा वापर थांबवण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदत आणि बचावासाठी जलद कारवाई करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क ठेवण्यात आले आहे. सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन कक्षा आहेत जेणेकरून पाणी साचणे, झाडे तोडणे, ड्रेनेजमध्ये अडथळा येणे आणि इतर संबंधित समस्यांबद्दल नागरिकांच्या चिंता दूर होतील.