जास्त पगाराची नोकरी नाकारली म्हणून तरुणाला दुकानात घुसून मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक विचित्र घटना घडली आहे. एका तरुणाला दुकान मालकांनी जास्त पगाराची ऑफर (rejected job offer) देऊन देखील तरुणांनी नोकरी करण्यास नकार (rejected job offer) दिल्याने रागावलेल्या दुकान मालकांनी चक्क त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

खासगाव शहराच्याच मेन रोडवर एक कलेक्शन दुकान आहे. या दुकानात आशिष मिलिंद वानखडे हा तरूण काम करत होता. याच दुकानाला लागून शेजारी हाफीज बुराणी यांचे दुकान आहे. आशिष मिलिंद वानखडे यांना जास्त पगाराची ऑफर(rejected job offer) देऊन नोकरी करण्यास सांगितले. पण आशिषने त्यास नकार दिल्याने संतपलेल्या हाफीज बुराणी यांच्याबरोबर अविनाश नावाच्या एका तरुणाने आशिषला जबर मारहाण केली. ही गोष्ट जेव्हा आशिष ज्या दुकानात काम करतो त्या मालकाला कळली तेव्हा ते देखील त्यांना समजावण्यासाठी गेल्यास त्यांनासुद्धा बुराणी आणि अविनाश यांनी मारहाण केली.

हा संपूर्ण प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.खामगाव पोलिसांनी हाफीज बुराणी आणि अविनाश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय