खारकोपर ते उरण रेल्वेमार्ग कधी होणार सुरु? समोर आली मोठी अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात रस्ते आणि रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढवले जात आहे. या नवं – नवीन प्रकल्पामुळे वाहतूक व दळणवळण सुविधेमध्ये वृद्धी होताना दिसून येत आहे. असे असताना मागच्या 26 वर्षांपासून रखडलेला खारकोपर ते उरण या रेल्वे मार्ग कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या मार्गाचे काम पूर्ण झाले असून या मार्गाचे उदघाटन येत्या 12 जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

26 वर्षांपासून सुरु आहे काम

रायगड जिल्ह्यातील नेरुळ ते उरण या रेल्वे मार्गाचे काम मागच्या 26 वर्षांपासून सुरु आहे. 2018 मध्ये या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. मात्र दुसरा टप्पा अजूनही पूर्ण झालेला नाहीये. असे असताना नेरुळ ते खारकोपर हा मार्ग सध्या सुरु आहे. मात्र खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गाचे काम अजूनही बाकीच आहे. त्यामुळे हा मार्ग कधी सूरू होणार असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. मात्र या नवीन वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल सेतूचे लोकार्पण करणार आहेत. यामुळे याच दिवशी खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गाचे देखील उद्घाटन होऊ शकते. असे सांगण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाने पाठवला पंतप्रधान कार्यालयाला प्रस्ताव

अटल सेतूचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाला रेल्वे प्रशासनाने पत्रक पाठवले आहे. मात्र अजून तरी याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. खारकोपर ते उरण दरम्यानच्या या नव्या प्रकल्पामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून थेट उरण पर्यंत लोकलने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

14.6 किलोमीटरचा आहे रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा

खारकोपर- उरण या रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा हा 14.6 किलोमीटर लांबीचा असून या रेल्वे मार्गामुळे उरणकरांना थेट सीएसएमटी पर्यंत लोकलने पोहोचता येणार आहे. तसेच यामध्ये खारकोपर- उरण या रेल्वे मार्गावर गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच रेल्वे स्थानके आहेत. हा प्रकल्प लवकरच सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.