हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेड आळंदी (Khed Alandi) … विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) … राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांना साथ दिली… पण लोकसभेला काही तुतारीच्या विरोधात मतदार संघातून लीड देता आलं नाही… थोडक्यात मोहिते पाटलांची आमदारकी येत्या विधानसभेला आधीच काठावर आहे… पण आता शरद पवारांनी बंड केलेल्या आमदारांना सांगून पाडायचंच, असा जणू चंग बांधलाय… त्यासाठी त्यांनी मोहिते पाटलांचा सांगून कार्यक्रम करण्यासाठी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात एक नवा मोहरा शोधलाय… तालुक्यातील मोठं प्रस्थ असणाऱ्या मोहिते पाटलांना यंदा अजितदादा आपली ताकद लावून निवडून आणतील का? मोहिते पाटलांच्या विरोधात मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नक्की कुणी कुणी दंड थोपटलेत? आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन खेड आळंदीत यंदा कुठला नेता आमदारकीचा गुलाल लावतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
पुणे नाशिक हायवेला लागूनच असणारा खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ म्हणून 2009 ला अस्तित्वात आला… संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवाची आळंदी, निमगाव-दावडीचा खंडोबा, कन्हेरसरची देवी अशी तीर्थक्षेत्र. भामा-आसखेड आणि चासकमान ही धरणं. भुईकोट, भोरगिरी आणि देव-तोरणे किल्ला असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या मतदारसंघाला लाभलाय… चाकण एमआयडीसी याच खेड आळंदीत येत असल्याने अनेक स्थलांतरित मजूर, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक वसाहतीसाठीही हा मतदारसंघ ओळखला जातो…
पण या मतदार संघाच्या निर्मितीनंतरच म्हणजेच 2009 च्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत इथून राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते पाटलांनी आमदारकी पटकावली… राष्ट्रवादी पक्षाला मतदारसंघात चांगला बेस मिळवून दिला… पण वाढत्या शहरीपट्ट्याच्या वाढलेले अपेक्षा मोहिते पाटलांना काही पूर्ण करता आल्या नाहीत… त्यामुळे खेड आळंदी मतदारसंघातील मतदारांचा मोठा भ्रमनिरास झाला… रखडलेली काम, सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांच्या वाढलेल्या महत्त्वकांक्षा, मतदारांना गृहीत धरनं या सगळ्याचा परिणाम असा झाला की की 2014 च्या लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम हक्काच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर गेले… हा जितका राष्ट्रवादीचा पराभव होता.. तितकाच मोहिते पाटलांचाही… अर्थात या सगळ्याचं रिफ्लेक्शन विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळालं… युत्या – आघाड्या वेगवेगळ्या झाल्या… आणि यातच मत विभाजनाचा फटका विद्यमान आमदार मोहिते पाटलांना बसला… राष्ट्रवादीसाठी बालेकिल्ल्यातच हा मोठा धक्का होता… 2014 ला इथून पहिल्यांदाच सुरेश गोरे यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा मतदार संघात फडकला…
आमदार – खासदार शिवसेनेचाच असल्याने खेड आळंदी येत्या काळातही राष्ट्रवादीच्या हातातून निसटणार की काय? अशी परिस्थिती होती… पण मराठा क्रांती मोर्चाला लागलेलं हिंसक वळण, रिक्षा चालकाला केलेली बेदम मारहाण आणि अतुल देशमुख हे खेळ आळंदीत नव्याने उदयास आलेलं नव नेतृत्व या सगळ्यातून पुन्हा मतदार संघाच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हातात आल्या… दिलीप मोहिते पाटील पुन्हा दुसऱ्यांदा आमदार झाले… शिवसेनेचे गोरे पराभूत झाले… पण अपक्ष लढत दिलेल्या अतुल देशमुखांनी तब्बल 19 फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतल्याने त्यांनी मतदारसंघातील प्रस्थापितांना धक्का दिला… पुढे महाराष्ट्रातील बदलत्या समीकरणांचा इम्पॅक्ट खेड आळंदीवरही बघायला मिळाला…
राष्ट्रवादीच्या फुटीत दिलीप मोहिते पाटील यांनी अजितदादांना साथ दिली… त्यांचे विरोधक माजी आमदार सुरेश गोरे शिंदे गटात आले… त्यामुळे गोरे आणि मोहिते पाटील एकाच गटात आल्याने महायुतीची ताकद वाढली… पण विधानसभेला तिकीट कोणाला द्यायचं? याचा मोठा पेच निर्माण झालाय… हे सगळं प्लस मायनस डोक्यात घेऊन लोकसभेलाही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी मोठ लीड देण्याच्या मोहिते पाटलांनी घोषणा करूनही इथून अमोल कोल्हेंचीच गाडी पुढे राहिली… यातून एक गोष्ट क्लियर होती ती म्हणजे मोहिते पाटील या टर्मला पुन्हा डेंजर झोन मध्ये आहेत…
त्यात आघाडीत असणारा उमेदवारीचा स्पेस लक्षात घेता अतुल देशमुख यांनी शरद पवार गटात नुकताच प्रवेश केला… त्यामुळे खेड आळंदीची येणारी विधानसभा निवडणूक मोहिते पाटील विरुद्ध अतुल देशमुख अशी होणार असल्याचं जवळपास कन्फर्म आहे… शरद पवारांच्या बाजूने असणारे सहानुभूतीच वार, ठाकरेंच्या शिवसैनिकांची ताकद, दुखावला गेलेला राष्ट्रवादीचा जुना केडर, मुस्लिम आणि दलित मतांचा बसणारा फटका, लोकसभेला विरोधात गेलेला कौल आणि देशमुखांची मतदारसंघातील ताकद हे सगळं गणित जुळवल तर मोहिते पाटील यांच्यासाठी आमदारकी टफ जाणारी आहे…
अतुल देशमुख यांची मतदार संघातील ताकदही वाखण्याजोगी आहे… 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवून त्यांनी याचा ट्रेलर मतदार संघातील प्रस्थापितांना दाखवला होताच.. मतदारसंघातील ग्रामपंचायत, सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा सगळ्या पातळ्यांवर निर्णय राजकीय खेळी अतुल देशमुख करत असतात… बैलगाडा शर्यत्यांपासून ते लग्न समारंभापर्यंत पब्लिक टच मध्ये राहण्यात ते सध्या सर्वात जास्त आघाडीवर आहेत…. त्यात शरद पवारांकडून येणाऱ्या विधानसभेला बळ मिळणार असल्यानं यंदा खेड आळंदी मध्ये अतुल देशमुख यांचा विजय कन्फर्म समजला जातोय… पण यासोबतच भाजपकडून शरद बुट्टे पाटील, हिंदी गटाकडून अक्षय जाधव, ठाकरे गटाकडून बाबाजी काळे यांचीही नाव इच्छुकांच्या यादीत असल्याने येत्या काळात खेड आळंदीच्या राजकारणाला कसं वळण लागतय? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे….मतदारसंघात बेरोजगारी, चाकण चौकातील ट्राफिक, सांडपाणी आणि शहरी विकास काम हे प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वात जास्त हायलाईटेड असणार आहेत… बाकी खेड आळंदीत यंदा आमदार कोण होतोय? दिलीप मोहिते पाटील की अतुल देशमुख? तुमचा कौल कुणाच्या पाठीशी? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…