हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांचे फॅड बघायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर कोरियन कार निर्माता कंपनी Kia ने EV3 हि आपली नवीन इलेक्ट्रिक कार जागतिक बाजारात सादर केली आहे. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक कार तब्बल ६०० किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करेल.
फीचर्स –
Kia EV3 चे डिझाईन EV9 सारखे ठेवण्यात आले आहे. या इलेक्टिक कारची लांबी 4,300 मिमी, रुंदी 1,850 मिमी, उंची 1,560 मिमी आणि व्हीलबेस 2,680 मिमी आहे. कंपनीने यामध्ये ब्लँक ऑफ ग्रिलसह क्यूबिकल आकाराचे LED हेडलाइट्स, L आकाराचे LED DRL , खालच्या बंपरमध्ये वाइड एअर इनलेट देण्यात आले आहेत. KIA चाय या इलेक्ट्रिक कार मध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रूफ स्पॉयलर, शार्क फिन अँटेना, पार्किंग सेन्सर्स, पॅनोरॅमिक सनरूफ, थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील, १२.३ इंच इंफोटेनमेंट सिस्टम, १२.३ इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्लोटिंग सेंटर कन्सोल यांसारखे फीचर्स देण्यात आली आहे. कारमध्ये 460 लीटरची बूट स्पेस मिळतेय.
600 KM रेंज – Kia EV3
कंपनीने या SUV मध्ये 58.3 kWh आणि 81.4 kWh असे २ बॅटरी पर्याय दिले आहेत. या बॅटरी Kia च्या फोर्थ जनरेशन तंत्रज्ञानापासून बनवल्या गेल्या आहेत. हि बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 31 मिनिटे वेळ लागतो मात्र एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर KIA ची हि इलेक्ट्रिक कार तब्बल 600 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे असा दावा कंपनीने केला आहे. कारला 170 किलोमीटर प्रति तास इतकं टॉप स्पीड असून अवघ्या 7.5 सेकंदात 0-100 किमी वेग वाढवण्यास सक्षम आहे.
भारतात कधी लाँच होणार?
Kia EV3 ही SUV सर्वात आधी दक्षिण कोरियामध्ये जुलै महिन्यात सादर केली जाईल. यानंतर ते जुलै ते डिसेंबर दरम्यान युरोपातील काही देशांमध्ये गाडीचे लौंचिंग होईल. भारतात मात्र हि इलेक्ट्रिक कार 2025 पर्यंत दाखल होऊ शकते असं बोललं जातंय गाडीच्या किमतीत मात्र कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही.