हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाहन उत्पादन कंपनी Kia ने आपली प्रसिद्ध SUV Kia Seltos नव्या व्हर्जनसह लाँच केली आहे. या नव्या Seltos मध्ये तुम्हाला अपडेटेड फीचर्स आणि नवनवीन कलर पहायला मिळतील. गाडीच्या इंटीरियर आणि बाहेरील बाजूमध्ये काही बदल करण्यात आले आहेत . आज आपण जाणून घेऊयात Kia च्या या नव्या अपडेटेड Seltos मध्ये नेमकं काय खास आहे.
लुक आणि डिझाईन –
गाडीच्या लूक आणि डिझाईन बाबत सांगायचं झाल्यास यामध्ये समोरील बाजूस LED DRLs सह नवीन लोखंडी जाळी आहे. तसेच नव्याने डिझाइन केलेले बंपर, नवीन फॉक्स स्किड प्लेट आणि एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देखील मिळतात. दुसरीकडे केबिनच्या आत तुम्हाला डॅशबोर्डमध्ये एक नवीन पॅनोरामिक डिस्प्ले मिळेल. यामध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. एक म्हणजे इन्फोटेनमेंट युनिटसाठी आणि दुसरी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी. Kia Seltos तब्बल 13 रंगाच्या पर्यायात खरेदी करता येईल.
इंजिन –
Kia Seltos मध्ये 2 इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. एक म्हणजे 1.6-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन जे 195 Hp पॉवर आणि 264.4 Nm टॉर्क जनरेट करते . आणि दुसरे म्हणजे 2 -लिटर चार-सिलेंडर इंजिन जे 146 Hp पॉवर 179 Nm टॉर्क जनरेट करते.
फीचर्स –
गाडीच्या फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Kia Seltos च्या या नव्या व्हर्जनमध्ये स्लीक हेडलाइट्स, व्हर्टिकल आऊट आइस क्यूब एलईडी लाईट्स, नवीन 18 इंच अलॉय व्हील, 10.25 इंच ड्युअल पॅनोरमिक डिस्प्ले असे अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच यामध्ये तुम्हाला ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, आरामदायी सीट्स, वायरलेस चार्जर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांसारखी अनेक फीचर्स पहायला मिळतील.
किंमत किती –
Kia Seltos चे नवं व्हर्जन LX, S, X-Line, EX आणि SX या व्हेरियेण्टसाठी लाँच करण्यात आलय. सध्या तरी फक्त अमेरिकेतच नव्या Kia Seltos चे लौंचिंग करण्यात आलं असून याची किंमत $24390 डॉलर म्हणजे भारतीय चलनात सुमारे 20 लाख रुपये आहे. तसेच गाडीच्या टॉप व्हेरिएंटची किंमत भारतीय चलनानुसार सुमारे 24.59 लाख रुपये आहे.