व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार; सोमय्यांनी घेतली 5 नेत्यांची नावे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर एकामागून एक घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. येत्या नवीन वर्षात पुन्हा एकदा घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार असं म्हणत त्यांनी 5 नेत्यांची थेट नावंच जाहीर केली आहेत. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय, अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, काँग्रेसचे अस्लम शेख यांच्या नावाचा समावेश आहे.

सोमय्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले, अनिल परब साई रिसॉर्ट, हसन मुश्रीफ, अस्लम खान यांचे ४९ स्टुडिओ, किशोरी पेडणेकर एसआरए फ्लॅट्स, मुंबई महापालिका घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही किरीट सोमय्या सातत्याने काही नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते. यापूर्वी अनिल परब यांच्यावर त्यांनी साई रिसॉर्ट प्रकरणी गंभीर आरोप केले होते. तर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यामुळे आता नव्या वर्षात सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणखी कोणते आरोप करणार आणि त्याचे पुरावे देणार का? हे पाहावं लागेल.