Kisan Credit Card : शेतकऱ्यांना 5 लाखांपर्यंत कर्ज मिळणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Kisan Credit Card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Kisan Credit Card। मान्सूनच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ३ लाखांहून ५ लाख रुपये करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्याचा निर्णय सरकार कडून घेतला जाऊ शकतो. असं झाल्यास शेतकऱ्यांना शेती करताना मोठा आर्थिक आधार मिळेल.

फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ७.७ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठीच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. आता याची थेट अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सरकार कडून सुरु असल्याचं बोललं जातंय.

काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना- Kisan Credit Card

भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने १९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. या कार्डच्या (Kisan Credit Card) माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चासाठी कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. एखाद्या शेतकऱ्याकडे शेतीसाठी पैसे नसतील तर तो ‘किसान क्रेडिट कार्ड’ वापरू शकतो.बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन, पीक कापणी अशी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात. केसीसी कार्डधारकांना पीक विमा योजनेचे फायदे देखील मिळतात. याशिवाय, तुम्ही पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन यासारख्या कामांसाठी देखील कर्ज घेऊ शकता. Kisan Credit Card

शेतकऱ्याच्या गरजा आणि जमिनीच्या मालकीनुसार कर्जाची मर्यादा ठरते. सामान्यतः, 1.6 लाख रुपयांपर्यंत कर्ज बिनतारण मिळू शकते, तर त्यापेक्षा जास्त रकमेसाठी जामीन आवश्यक असते. किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजदर (साधारणतः 7% वार्षिक) लागू होतो. जर शेतकऱ्याने वेळेवर कर्ज परतफेड केली, तर व्याजात 3% पर्यंत सवलत मिळू शकते.

कसे बनवाल किसान क्रेडिट कार्ड –

किसान क्रेडिट कार्डसाठी, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, जमिनीच्या नोंदी,पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुकची प्रत हि कागदपत्रे लागतात.

अर्ज दाखल करण्यासाठी https://pmkisan.gov.in](https://pmkisan.gov.in या अधिकृत वेब साईटवर जावा.
KCC फॉर्म विभागातून फॉर्म डाउनलोड करा.
सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे भरा.
त्यानंतर हा फॉर्म जवळच्या बँक शाखेत जमा करा.
फॉर्म जमा केल्यानंतर, बँक अधिकारी कागदपत्रांची पूर्णपणे तपासणी करतील आणि तुम्हाला कार्ड देतील.