Kisan Credit Card Scheme | केवळ 10 मिनिटात शेतकऱ्यांना मिळणार 1.5 लाखांचे कर्ज, केंद्र सरकारची नवी योजना जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kisan Credit Card Scheme | शेतकऱ्यांना अनेक गोष्टीसाठी पैसे लागत असतात. शेतीतील कामासाठी त्यांना बियाणे त्याचप्रमाणे खत घ्यायला पैसे लागतातच. परंतु या व्यतिरिक्त देखील अनेक कामांसाठी त्यांना पैसे लागतात. अशा वेळी लोक इतर बँकेतून कर्ज घेतात किंवा सावकाराकडून कर्ज घेतात. परंतु आजकाल बँका देखील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी लवकर पुढे येत नाही. यासाठी शेतकऱ्यांना बँकेची पायपीट करावी लागते. आता शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे शेतकऱ्यांना अगदी एका मिनिटात कर्ज उपलब्ध होणार आहे. आता ही योजना नक्की काय आहे आणि याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

किसान क्रेडिट कार्ड | Kisan Credit Card Scheme

आपल्या देशातील आता सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट (Kisan Credit Card Scheme) कार्डच्या माध्यमातून कर्ज दिले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला त्यांना पैसे मिळावेत यासाठी केंद्राने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सध्या देशातील दोन जिल्ह्यांसाठी हा प्रयोग करण्यात येत आहे उत्तर प्रदेशातील फारुखाबाद आणि महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा यात समावेश झालेला आहे.

ॲग्री स्टॅक ऍप मदतीला

या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या (Kisan Credit Card Scheme) मदतीने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. अवघ्या दहा मिनिटात तुमची ही कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. यासाठी तुम्हाला ॲग्री स्टॅक ऍपची मदत घ्यावी लागते. या ॲपच्या मदतीने तुम्हाला केवळ दहा मिनिटात दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. त्याचप्रमाणे ही कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना काहीही तारण ठेवावे लागणार नाही. बीड जिल्ह्यामध्ये मे महिन्यापासून या योजनेला सुरुवात होत आहे.

एकाच ॲपवर होणार पिकांची नोंदणी

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज देण्यासाठी आता सरकारने हे ॲग्री स्टॅक ॲप विकसित केलेले आहे. या ॲपवर देशातील सर्व पिकांच्या नोंदणी केली जाईल. त्याचप्रमाणे खरीप पिकांपासून ते देशातील जी काही सर्व पीक आहेत. त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला या ॲपवर माहिती पाहायला मिळेल.