Kisan Credit Card | आपल्या देशात बहुतांश शेतकरी आहेत. आपल्या देशातील अर्थव्यवस्था ही जवळपास 75 टक्के शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाहीत. आणि त्यांना चांगल्या प्रकारे पीक घेता येईल. अशाच आता सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर अल्पमुदतीसाठी कर्ज मिळते. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने ही किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यंत कर्ज मिळते.
तसेच किसान क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांना याशिवाय अनेक सुविधा देखील मिळतात. या योजनेअंतर्गत कार्डधारकांना मृत्यू किंवा कायमचे अपंगत्वासाठी 50 हजार रुपये, तर इतर जखमींसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देखील दिले जाते. या क्रेडिट कार्ड सोबत शेतकऱ्यांना बचत खाते, स्मार्ट आणि डेबिट कार्ड देखील दिले जाते. या बचतीवर त्यांना व्याज देखील मिळते. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे देखील देण्यासाठी सोपे आहे. त्यांना तीन वर्षाची मुदत मिळते.
किसान क्रेडिट कार्डचा लाभ कोणाला मिळतो? | Kisan Credit Card
सरकारच्या या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ जमीन मालक, वाटेकरी, भाडेकरू शेतकरी यांना मिळतो. हे लोक यासाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते जास्तीत जास्त 75 वर्षे असणे गरजेचे आहे.
असा ऑनलाइन अर्ज करा
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ज्या बँकेतून लाभ घ्यायचा आहे, त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाईटवर गेल्यावर होम पेजवर क्रेडिट कार्ड हा पर्याय दिसेल.
- आता तुम्हाला आपला या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल.
- तुम्ही हा आजचा सविस्तर भरायचा आहे.
- आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचे.