Kisan Pension Yojana : शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना!! 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपयांची पेन्शन

Kisan Pension Yojana for farmers
Kisan Pension Yojana for farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्याला मोठं महत्व या देशात आहे. केंद्रातील मोदी सरकार सुद्धा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. शेतकऱ्यांना आर्थिक चणचण पडू नये आणि त्याचे जीवन सुखकर जावं यासाठी सरकार वेगवेगळ्या योजनांच्या (Kisan Pension Yojana) माध्यमातून आर्थिक हातभार लावत असते. परंतु अशा काही योजना आहेत ज्या शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोचत नाही आणि त्याचा लाभ घेण्यापासून तो वंचित राहतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी एक सरकारी योजना सांगणार आहोत ज्यामाध्यमातून अवघ्या ५५ रुपयांच्या गुंतवणुकीतून दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन शेतकरी मिळवू शकतात.

आम्ही तुम्हाला ज्या योजनेबद्दल सांगत आहोत तिचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Kisan Maan Dhan Yojana) …. २०१९ साली केंद्र सरकारने हि योजना लाँच केली होती. या योजनेच्या माध्यमातून वयाच्या ६० व्या वर्षानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन मिळते आणि वृद्धपकाळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार मिळतो. जर शेतकऱ्याचे निधन झालं तर त्याच्या पत्नीला दर महिन्याला १५०० रुपयांची पेन्शन मिळेल. सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना अर्ज करून दर महिन्याला ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतील.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे – Kisan Pension Yojana

आधार कार्ड
मोबाईल क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो
ओळखपत्र
वयाचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
बँक खाते पासबुक

अर्ज कुठे करायचा –

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा (Kisan Pension Yojana) लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर लॉग इन करावे लागेल.
आता या योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती त्यात टाकावी लागेल.
त्यानंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करा आणि ओटीपी टाका
या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल.
आता तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.