पोस्ट ऑफिसची खास योजना!! 5 लाख रुपये गुंतवल्यास मिळणार 10 लाख रूपये; येथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य आणि केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनांचा (Post Office Scheme) देखील सर्वात जास्त समावेश असतो. कारण पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगला परतावा दिला जातो. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. या योजनेतून तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल. तसेच या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळतील. त्यामुळे ही योजना नेमकी कोणती आहे?? त्याचा लाभ कसा घ्यावा?? याविषयी जाणून घ्या.

5 लाख रुपये गुंतवल्यास 10 लाख मिळणार

सध्या पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Yojana) योजना सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे. ही योजना सर्वात प्रथम भारतीय टपाल विभागाने 1988 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती. त्यामुळे या योजनेला किसान विकास पत्र योजना असे नाव देण्यात आले आहे. परंतु कोणताही भारतीय नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो. जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 9.5 वर्षांनंतर 10 लाख रुपये मिळतील. सध्या या योजनेतील व्याजाची रक्कम 7.5 टक्के आहे. तर योजनेचा लॉक इन कालावधी 2.6 वर्षे म्हणजेच 30 महिने आहे.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?

किसान विकास पत्र योजनेचा लाभ 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो. जर एखादया अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर या योजनेत गुंतवणूक केल्यास पालकांना त्याच्या नावाने नियोजन पत्र घ्यावे लागेल.
तसेच या योजनेमध्ये दोन व्यक्ती एकत्र अर्ज करू शकतात. यामुळे याचा फायदा त्या दोन्ही व्यक्तींना होईल.

योजनेसाठी कसा अर्ज करता येईल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमधून फॉर्म घेऊ शकता. तुम्हाला हा फॉर्म भरून तो कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागेल. तुम्ही दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी आणि ठराविक रक्कम जमा केल्यानंतर तुम्हाला किसान विकास पत्र प्रमाणपत्र जारी केले जाईल. तसेच या संबंधित तुम्हाला ई-मेल देखील पाठवला जाईल.