Kitchen Jugaad Video | आपल्या घरात असणारे टॉयलेट क्लिनर आपण टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी वापरतो. टॉयलेट क्लिनरचा वापर आपण इतर कोणत्याही गोष्टीसाठी करत नाही. परंतु तुम्ही कधी तुमच्या फ्रीजला टॉयलेट क्लीनर लावून पाहिले आहे का? आता तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न? फ्रीजला कोणी टॉयलेट क्लीनर लावत का? परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, जर तुम्ही टॉयलेट क्लिनर फ्रीजला लावले, तर तुमचे लाईट बिल कमी होणार आहे. एका गृहिणीने एक जबरदस्त किचन जुगाड केला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Kitchen Jugaad Video) प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
आपण घरात जेव्हा कोणतीही इलेक्ट्रिक गोष्ट वापरतो, तेव्हा त्याचा परिणाम लाईट बिलावर होतो. आणि आपल्याला दर महिन्याला जास्त लाईट बिल येते. आपण वारंवार फ्रीज उघडतो, त्यावेळी फ्रीजच्या आतील तापमानात फरक पडतो आणि फ्रीजला पुन्हा थंड करण्यासाठी जास्त वीज देखील लागते. त्यामुळे तुमचे लाईट बिल जास्त येते. परंतु आता या फ्रीजमुळे तुम्हाला लाईट बिलची कोणत्याही प्रकारचा टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आता टॉयलेट क्लिनर वापरून तुम्ही तुमचे लाईट बिल कमी करू शकता.
फ्रिजमुळे लाईट बिल का वाढते? | Kitchen Jugaad Video
अनेकदा आपण फ्रिजचा दरवाजा उघडतो, जेव्हा तो दरवाजा लावतो तेव्हा थोडासा दरवाजा उघडा राहतो. दरवाजा नीट लागत नाही. त्यामुळे आतील थंड हवा बाहेर पडते. यावेळी फ्रीजला गॅस बनवण्यासाठी देखील जास्त वीजेची गरज लागते. याचा परिणाम कॉम्प्रेसरवर होतो. दरवाजा नीट न लागण्याचं कारण म्हणजे दरवाजावर असलेला रबर किंवा गॅस किट असतो. हा रबर जुना झाला की, त्यात घाण जमा होते. त्यामुळे दरवाजा नीट लागत नाही.
याचाच अर्थ तुमचे लाईट बिल वाढण्याला अप्रत्यक्षपणे फ्रीजला असणारा रबर कारणीभूत असतो. त्यामुळे हा फ्रिजचा रबर स्वच्छ करण्याची खूप गरज आहे. तो रबर सहसा स्वच्छ होत नाही. यावेळी तुम्ही जर एका भांड्यात हारपिक क्लिनर घेऊन टूथब्रशच्या मदतीने फ्रीजचा रबर चांगला घासला, तर तो पूर्ण स्वच्छ होऊ शकतो. यावेळी रबरमध्ये अडकलेली सर्व घाण स्वच्छ होईल. काही मिनिटातच रबर नव्यासारखा होईल. जेव्हा तुम्ही हा फ्रीचा दरवाजा बंद कराल, तेव्हा तो आधीपेक्षा जास्त घट्ट बसेल. त्यामुळे त्यातील थंड हवा बाहेर जाणार नाही आणि तुमचे लाईट बिल देखील कमी येईल. अशा प्रकारे तुम्ही हा जुगाड वापरून तुमचे लाईटचे बिल कमी करू शकता.