Kitchen Tips : शेफ कुणाल कपूर यांनी सांगितली भारी ट्रिक ; एका मिनिटात फुटेल नारळ, निघेल खोबरं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मध्ये नारळ अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. चटण्या असो किंवा भाज्यांची ग्रेव्ही किंवा मग मस्त झणझणीत नॉनव्हेजचा बेत, नारळ हा वापरलाच जातो. मात्र नारळ फोडणे म्हणजे वेळखाऊ आणि कटकटीचे काम वाटते. पण प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये नारळ फोडण्याची एक सोपी ट्रिक दाखवली असून या ट्रिकच्या (Kitchen Tips) मदतीने एका मिनिटात नारळ फोडता येईल. शिवाय नारळाचं खोबरं कसं काढायचं याची सुद्धा ट्रिक कपूर यांनी सांगितली आहे. चला तर मग जाणून घेऊया…

काय आहे नारळ फोडण्याची ट्रिक (Kitchen Tips)

कुणाल कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या ट्रिक नुसार नारळ फोडताना सर्वप्रथ नारळाचे पाणी काढण्यासाठी चाळणी आणि एक बाउल घ्या त्यानंतर नारळाच्या ज्या मुख्य शिरा असतात. त्यावर बत्ता किंवा लाटण्याने हलके ३-४ फटके मारा. त्यानंतर एक जोरदार फटका (Kitchen Tips) मारल्यास लगेच नारळ फुटेल.

नारळाचं खोबरं काढण्यासाठी (Kitchen Tips)

नारळ फोडण्यासोबत नारळाचे खोबरे काढणे सुद्धा तितकेच कठीण (Kitchen Tips) काम आहे. म्हणूनच याबाबदलाची ट्रिक सुद्धा कपूर यांनी सांगितली आहे. नारळ फोडल्यानंतर गॅसवर एक जाळी ठेऊन ३०-३५ सेकंदासाठी नारळ शेकून घ्या. त्यानंतर त्यातील मॉइश्चर सुकू लागेल. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरीच्या साहाय्याने नारळातील पूर्ण खोबरे लगेच निघेल. हे खोबरं सहज कापून तुम्ही चटणी किंवा इतर पदार्थ (Kitchen Tips) बनवू शकता.