Kitchen Tips : फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ‘हे’ पदार्थ ; टिकण्याऐवजी होतील खराब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : फ्रीज ही अशी वस्तू आहे जी प्रत्येक घरात आवर्जून असतेच. किचन मधील भाज्या , पाणी ,सॉसेस, ड्रायफ्रुटस अशा बऱ्याच गोष्टी ठेवल्या जातात. फ्रीज म्हंटल की आपल्याला यात ठेवल्यावर पदार्थ खराब होणार नाहीत असा समज असतो. त्यामळे जे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवायचे नसतात असे अनेक पदार्थ फ्रिजमध्ये अक्षरश: कोंबले जातात. शिळे अन्न , लोणी, शिल्लक राहिलेले कणिक असे बरेच पदार्थ फ्रिजमध्ये ढकलले जातात. पण तुम्हाला माहित आहे का ? काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ते टिकण्याऐवजी (Kitchen Tips) खराब होतात. चला पाहुयात असे कोणते पदार्थ आहे जे चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नयेत…

बटाटा

बटाटा फ्रिजच्या गारठ्यामुळे त्याच्यातील स्टार्च रूपांतर साखरेत करतो. त्यामुळे बटाट्याची चव फ्रिजमध्ये (Kitchen Tips) ठेवल्यानंतर बदलते. त्यामुळे बटाटा कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका.

लसुन

लसूण देखील फ्रीजमध्ये शक्यतो ठेवू नये कारण थंड हवेमुळे लसणाला (Kitchen Tips) कोंब येतात आणि लसूण हा रबरा सारखा चिवट होतो.

टोमॅटो

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्याचे टेक्सचर आणि फ्लेवर सुद्धा खराब (Kitchen Tips) होते त्यामुळे टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

केळी

कच्ची केळी असतील तर ती फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याची पिकण्याची जी प्रक्रिया असते ती बंद होते त्यामुळे केळी फ्रीजमध्ये ठेवू नका.

ब्रेड

ब्रेड कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये कारण ब्रेड जर फ्रीजमध्ये ठेवला तर तो कोरडा होतो. शिवाय ब्रेड लवकर शिळा होतो.

मध (Kitchen Tips)

मग फ्रिजमध्ये ठेवू नये कारण मधा मधल्या साखरेचा जो भाग असतो तो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर वेगळा होतो.