Kitchen Tips : मिक्स करा केवळ एक पदार्थ आणि इडल्या होतील मऊ, लुसलुशीत, यम्मी…!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : रोजच्या नाश्त्याला इडली,डोसे, आंबोळी असे साऊथ इंडियन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही ? हे पदार्थ संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नाश्त्याला आवर्जून इडली बनवली जाते. शिवाय आंबवलेल्या पीठात बरेच प्रो बायोटिक्स असतात जे पोटासाठी आणि आतड्यांसाठी चांगले असतात. म्हणून इडली खाण्याचा सल्ला (Kitchen Tips) देतात. मात्र तुम्ही घराच्या घरी इडली बनवत असाल तर इडली बऱ्याचदा फसते. कधी कधी ती हवी तशी सॉफ्ट होत नाही. कारण इडलीचे मिश्रण नीट फर्मेंट होत नाही.

तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर काळजी करू नका केवळ एक छोटीशी टीप आणि तुमच्या इडल्या होतील मऊ उसलुशित घरची मंडळी तुमच्या इडलीचे तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत . चला तर मग जाणून घेऊया इडलीची (Kitchen Tips) खास रेसिपी…

साहित्य (Kitchen Tips)

तांदूळ, उडीद डाळ, पाणी, मीठ, मेथी दाणे , शिजवलेला भात

कृती (Kitchen Tips)

ही कृती करताना सर्वात आधी तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. आता हे दोन्ही स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे दोन-तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. म्हणजे इडली ही पांढरी शुभ्र होते. आता तुम्हाला उद्या सकाळी नाश्त्याला इडली (Kitchen Tips) हवी असेल तर आदल्या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान तुम्ही हे तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालू शकता.

याबरोबरच एक छोटा चमचा मेथी दाणे सुद्धा घाला म्हणजे फर्मेंटेशन ची प्रोसेस चांगल्या प्रकारे होते. आता रात्री झोपताना तुम्हाला हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. तांदूळ आणि डाळ साधारण ८ तास भिजायला हवेत. आता. वाटत असताना त्यामध्ये शिजलेला भात थोडा घाला त्यामुळे इडल्यास सॉफ्ट होतील. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फर्मेंटेशन ची प्रोसेस कधी कधी वेळानं होते त्यामुळे मीठ घालत असताना (Kitchen Tips) ऋतूनुसार घालावे. म्हणजे पावसाळा असल्यास मीठ हे मिश्रण वाटतानाच घाला आणि जर उन्हाळा असेल तर मीठ दुसऱ्या दिवशी घाला म्हणजे फर्मेंटेशन मुळे पीठ जास्त आंबट होणार नाही.