उन्हाळ्यात किचनची होते भट्टी ? या 6 सोप्या आणि घरगुती टिप्स वापरा आणि Cool रहा, घामापासून मुक्ती मिळावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips for summer : एप्रिल ते जून दरम्यान तापमान चढतं आणि स्वयंपाकघर म्हणजे तापत्या भट्टीसारखं वाटू लागतं. चुलीपाशी घामाघूम होऊन स्वयंपाक करणं केवळ शारीरिक कष्टाचं काम नसून मानसिक थकवाही निर्माण करतं. पण काही साध्या उपायांनी तुमचं किचन ‘कूल’ ठेवता येतं तेही एअर कंडिशनरशिवाय! अशा परिस्थितीत तुम्ही जर घरगुती उपाय शोधत असाल, जे सहज करता येतील आणि वीजेचा खर्चही वाचेल, तर खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत उन्हाळ्यात उकाड्यापासून मुक्ती मिळवणाऱ्या 6 प्रभावी (Kitchen Tips for summer) टिप्स.

  1. किचनमध्ये नैसर्गिक वारा येईल यासाठी खिडक्या उघड्या ठेवा

किचनमधील हवा सतत बाहेर जाणं आणि नवीन वारा येणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता, तेव्हा खिडक्या पूर्णपणे (Kitchen Tips for summer) उघड्या ठेवा. यामुळे वाफ, उष्णता आणि धूर लगेच बाहेर जातो. दोन समोरासमोर खिडक्या असतील, तर क्रॉस व्हेंटिलेशन होऊन अधिक थंडावा जाणवतो.

  1. चिमणी आणि एक्झॉस्ट फॅन वापरा (Kitchen Tips for summer)

स्वयंपाक करताना निर्माण होणारा धूर आणि उष्णता बाहेर टाकण्यासाठी एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी अत्यंत उपयुक्त ठरते. ही उपकरणं गरम हवेला आत साचू न देता लगेच बाहेर फेकतात आणि तुमचं किचन ‘घामाघूम’ होण्यापासून वाचवतं.

  1. कुलिंग स्प्रेचा वापर (Kitchen Tips for summer)

फ्रीजरमध्ये ठेवलेला साधा पाण्याचा स्प्रे बॉटल घ्या आणि स्वयंपाक सुरू करण्याआधी भिंतींवर, खिडक्यांवर किंवा अंगावर हलकासा कुलिंग स्प्रे मारल्यास त्वरीत थंडावा मिळतो. बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक अर्क असलेल्या कुलिंग स्प्रेचा वापरही करू शकता.

  1. खिडक्यांवर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावा

उन्हाळ्यात सकाळीच किचनमध्ये ऊन पडायला लागतं. यासाठी खिडक्यांच्या काचेवर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावल्यास सूर्यकिरण आत येण्याचं प्रमाण खूपच कमी होतं. ही एक स्वस्त, घरगुती आणि प्रभावी ट्रिक आहे, ज्यामुळे खोलीतील उष्णता लक्षणीय प्रमाणात कमी होते.

  1. मातीच्या भांड्यांचा वापर करा

स्टील आणि प्लास्टिकच्या भांड्यांपेक्षा मातीची भांडी नैसर्गिक थंडावा देतात. उकडणाऱ्या उन्हात मातीच्या भांड्यांतून पाणी पिणं तर उत्तमच, पण मातीच्या हंडीत अन्नही ठेवता येतं. यामुळे गरम अन्नाची उष्णता थोड्या वेळात कमी होते आणि संपूर्ण किचन थोडंसा थंड राहतो.

  1. खिडक्या आणि दरवाजांवर ओलं कापड टांगून ठेवा

ही पारंपरिक पण अत्यंत प्रभावी युक्ती आहे. किचनच्या खिडक्या, दरवाज्यावर ओलं कापड किंवा टॉवेल टांगून ठेवल्यास वारा आत येताना थंड होतो. ही युक्ती फार कमी खर्चात थंडावा देणारी असल्याने ग्रामीण भागात आजही (Kitchen Tips for summer) वापरली जाते.

उन्हाळ्याच्या दिवसांत किचनमध्ये काम करणं अत्यंत कठीण होऊन बसतं. पण वरील टिप्स वापरून तुम्ही तुमचं किचन हवेशीर, थंड आणि आरामदायक बनवू शकता. एसी किंवा कूलरशिवायही घरात थंडावा मिळवणं अशक्य नाही फक्त योग्य पद्धती आणि थोडी तयारी (Kitchen Tips for summer) गरजेची आहे.