Kitchen Tips : भारतीय आहार पद्धती ही खूप वैविध्यपूर्ण आहे. भारतातल्या प्रत्येक प्रदेशातील आहार हा तिथली खासियत असतो. भारतीय आहारात शरीराच्या गरजेनुसार तसेच ऋतुमानातील बदलानुसार विविध पदार्थ ताटामध्ये वादळे जातात. त्यातही चटण्या, कोशिंबिरी , लोणची, पापड अशा तोअंडी लावायच्या पदार्थांची तर भरमार असते. आज आम्ही तुम्हाला अशा एका चटणीच्या प्रकाराबद्दल (Kitchen Tips) सांगणार आहोत. जी केवळ जेवणाची लज्जत वाढवत नाही तर खाण्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आणि लाभदायी आहे. महिलांनी तर ही चटणी आवर्जून खावी. चला तर मग जाणून घेऊया…
आम्ही ज्या चटणी बद्दल बोलता आहोत ती म्हणजे कारळा चटणी. ही चटणी करण्यासाठी तुम्हाला वाटीभर कारळ घ्यावं लागेल. त्यानंतर 25 ते 30 ग्रॅम पांढरे तीळ, पाव वाटी शेंगदाणे, साधारणतः 20 ते 25 लसणाच्या सोललेल्या पाकळ्या. लाल तिखट (Kitchen Tips) अर्धा टी स्पून, जिरं 2-3 चमचे असे साहित्य लागणार आहे
कृती (Kitchen Tips)
- सर्वप्रथम कढई गरम करून घ्या त्यामध्ये कारळा भाजून घ्या. त्यानंतर शेंगदाणे आणि तीळ ही तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत.
- भाजलेले पदार्थ एका वाटीमध्ये काढून घ्या मिक्सरच्या भांड्यात हे साहित्य (Kitchen Tips) घाला त्यामध्ये सोललेला लसूण घालून हे मिश्रण बारीक करून घ्यावे लागेल.
- त्यानंतर हे वाटलेले मिश्रण एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घ्या
- तुम्हाला ही चटणी थोडीशी जाडसर ठेवायची आहे. ती जास्त बारीक (Kitchen Tips) केल्यास त्याला तेल सुटेल आणि त्याच्या चवीतही फरक पडेल
- तुम्हाला जर सुख खोबरं आवडत असेल तर सुख खोबरं तुम्ही घालू शकता
- जेवताना ही चटणी खाण्याचे खूप फायदे मिळतात.
शेंगदाणे आणि तिळाच्या सेवनामुळं शरीराला भरपूर फायदा मिळतात. यामध्ये (Kitchen Tips) कॅल्शियम खूप असते त्यामुळे हाडांना बळकटी मिळते सांधेदुखीचा त्रास कमी होतो. शिवाय हाडं मजबूत होतात याबरोबरच प्रोटीन्स मिळतात. जेवताना ही चटणी खाल्ल्याने महिलांचे अनेक आजारांपासून बचाव होतात थकवा आणि अशक्तपणा ही यामुळे जाणवत नाही.