Kitchen Tips : प्रत्येकाच्या घरात स्वयंपाक बनवण्यासाठी गॅस असतो. मात्र कधीकधी अचानक गॅस संपतो आणि पुरती धावपळ होते. मग स्वयंपाक अर्धवट राहतो. शिवाय सुट्टी दिवशी गॅस संपला तर गॅस लवकर मिळतही नाही. मात्र तूम्ही तुमच्या रोजच्या वापराच्या सिलेंडर मधे किती गॅस शिल्लक आहे हे पाहू शकता. आजच्या लेखात आपण याच संदर्भातली एक सोपी ट्रिक (Kitchen Tips) पाहणार आहोत. चला जाणून घेऊया…
खरं तर सिलेंडर लोखंडी असल्यामुळे आतमध्ये द्रवरूप गॅस किती आहे हे आपल्याला कळत नाही. मात्र सिलेंडर मध्ये किती गॅस शिल्लक आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला खूप काही खटाटोप करायची आवश्यकता नाही. तुम्हाला (Kitchen Tips) निव्वळ एका ओल्या कापडाची आवश्यकता आहे.
फॉलो करा स्टेप्स (Kitchen Tips)
- अनेकदा सिलेंडर हे कधी संपते हे पटकन लक्षात येत नाही मात्र ओल्या कपड्यानं तुम्ही हे सहज ओळखू शकता. यासाठी तुम्हाला (Kitchen Tips) एक ओला टॉवेल किंवा एक ओलं कापड घ्यायचा आहे.
- आता हे ओलं कापड सिलेंडर भोवती गुंडाळायचं आहे.
- त्यानंतर थोडा वेळ हे कापड असेच राहू द्या.
- काही मिनिटांनंतर सिलेंडर मधून ओले कापड काढाल तेव्हा सिलेंडरचा काही भाग कोरडा आणि काही भाग ओला झालेला दिसेल.
- सिलेंडरचा जो भाग कोरडा आहे तो रिकामा आहे तर जो भाग (Kitchen Tips) ओला आहे तेवढा सिलेंडर मध्ये गॅस शिल्लक आहे. कारण सिलेंडरच्या जितक्या भागामध्ये गॅस असेल तितका भाग द्रवरूप गॅसच्या थंडपणामुळे ओला होत असतो आणि लवकर वाळत नाही. पण त्या उलट ज्या भागात गॅस नाही तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा (Kitchen Tips)होतो.