Kitchen Tips : भारतात जवळपास प्रत्येक घरात डाळ शिजत असते. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये डाळींना खूप महत्व आहे. म्हणूनच डाळ ही भारतीय जेवणातील प्रमुख घटक आहे. प्रोटिन्सचा सोर्स म्हणजे डाळ. पण याच बरोबर यात मिनरल आणि व्हिटॅमिन्स पण असतात. म्हणूनच डाळ अगदी लहान मुलांपासून , वृद्ध आणि आजारी व्यक्तींना सुद्धा दिली जाते. पण तुम्हाला माहितीये का ? एका विशिष्ट पद्धतीने डाळ शिजवली तर त्यामधील पोषकतत्व टिकून राहतात. शिवाय चवीला सुद्धा अशी डाळ अप्रतिम होते चला तर मग जाणून घेऊया ही डाळ (Kitchen Tips) शिजवण्याची पद्धत…
डाळ शिजवण्यासाठीच्या टिप्स (Kitchen Tips)
- तुम्ही ज्या डाळीचा वापर करत आहात ती डाळ शिज वण्याआधी दोन ते तीन वेळा पाण्याने धुऊन घ्या. जेणेकरून डाळीवरील केमिकल्स आणि पॉलिश निघून जाईल
- डाळ शिजायला टाकण्याआधी डाळ 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. असं केल्यामुळे डाळ फुलेल आणि शिजायलाही जास्त वेळ लागणार नाही.
- कोणताही अन्नपदार्थ बनवताना तो प्रमाणात असावा म्हणजे जर तुम्ही डाळ बनवणार असाल तर डाळीच्या (Kitchen Tips) प्रमाणात पाणी घ्यावे लागेल. तुम्ही एक वाटी डाळ बनवत असाल तर आधी पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये तीन ते साडेतीन कप पाणी टाका.
- भांड्यात किंवा प्रेशर कुकरमध्ये आधी पाणी टाका या आता एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद पावडर टाका पाण्याला चांगली उकळी येऊ द्या आणि नंतर त्यामध्ये डाळ टाका. आता यावर छान झाकण ठेवा किंवा प्रेशर कुकर चे झाकण लावा. गॅस कमी आचेवरच असू द्या (Kitchen Tips) काही वेळाने डाळीला फेस आला तर झाकण लावण्या आधी तो फेस काढून टाकावा.
- दुसरी गोष्ट म्हणजे डाळ शिजवत असताना त्यामध्ये थोडसं तेल टाकलं तर यामुळे डाळीची चमक वाढते तसेच डाळीला (Kitchen Tips) टेस्टही चांगली येते.
- आता जर तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवत असाल तर कमीत कमी तीन ते चार शिट्या होऊ द्यात. गॅस वरून कुकर खाली काढा. शिट्टी आपोआप (Kitchen Tips)खाली पडू द्या. जर तुम्ही पातेल्यात डाळ शिजवत असाल तर कमी आचेवर ही डाळ पंधरा मिनिटे शिजू द्या.