Kitchen Tips : स्वयंपाक रुचकर करायचा म्हंटल्यावर लसूण असायलाच हवा. रोजच्या जेवणापासून अगदी पार्टी मेन्यू मध्ये देखील जेवणाची लज्जत वाढवायला लसूण हवाच. आपल्या रोजच्या जेवणात असे काही पदार्थ असतात ज्याच्यामध्ये लासणाचा हमखास वापर केला जातो. एखाद्या पदार्थाची लज्जत वाढवण्यामध्ये लसणाचा मोठा वाटा असतो. पण लसूण सोलणे हा तितकाच कंटाळवाणा आणि वेळखाऊ प्रकार आहे. शिवाय गडबडीच्या वेळेला लसूण सोलणे आणि मग स्वयंपाक बनवणे वेळखाऊ आहे. म्हणूनच जर तुम्ही लसणाची (Kitchen Tips) पावडर करून ठेवली तर हव्या त्या वेली तुम्ही लसूण पावडर वापरू शकता. ही लसूण पावडर वापरायची कशी ? चला जाणून घेऊया…
लसूण पावडर तयार करण्याची पद्धत (Kitchen Tips)
सगळ्यात आधी किलोभर लसून पाकळ्या मोकळ्या करून घ्या त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लसूण पाकळ्या सालीसहित घाला. आता एका मोठ्या चाळणीत लसूण पाकळ्या ठेवून त्यातील सर्व पाणी निथळून घ्या. पाणी निथळून झाल्यानंतर लसूण (Kitchen Tips) मिक्सरच्या भांड्यात घालून थोडा जाडसर वाटून घ्या.
आता हा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेला लसूण एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्या. हा वाटलेला लसून डिशमध्ये वाळवण्यासाठी ठेवून द्या. हा लसूण किमान तीन ते चार दिवस उन्हात वाळवण्यासाठी ठेवून द्या लसूण वाळवण्यासाठी ठेवलेल्या डिशला कॉटनचा कपडा (Kitchen Tips) बांधून उन्हात ठेवून द्या.
त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे उन्हात वाळल्यानंतर त्याच्या पाकळ्या आपोआप निघून जातील आता हा वाळलेला लसूण मिक्सरमध्ये घालून पुन्हा एकदा बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्या लसूण वाटून त्याची बारीक पूड झाल्यानंतर ही पूड चाळणीतून ओतून व्यवस्थित चाळून घ्या त्यानंतर हे पूड एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून स्टोअर करून ठेवा.
या लसणाच्या पावडरीचा वापर भाजी आमटी डाळ यांना फोडणी देण्यासाठी होऊ शकतो. किमान वर्षभरासाठी या पावडर चा वापर तुम्ही करू शकता हे पावडर खराब होऊ नये म्हणून दोन ते तीन महिन्यातून एकदा एका मोठ्या परातीत काढून उन्हात वाळवून ती परत स्टोअर (Kitchen Tips) करून ठेवावी. लसूण पावडर चा वापर केल्याने आपली रोज रोज लसूण सोलायची झंझट मात्र कायमची दूर होईल