Kitchen Tips : उडीद वडे हा दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती मधील पदार्थ असला तरी देशभर उडीद वडा खवैय्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. पण उडीद वडे घरी बनवायचे असतील तर थोडे कठीण वाटतात कारण घरचे वडे खुच तेलकट बनतात. असे तेल पिणारे वडे नकोसे वाटतात म्हणूनच आम्ही आज उडीद वाद्यांची अशा खास रेसिपी तुमच्यासाटी घेऊन आलो आहोत की ज्यामुळे वडे तेलात होत नाहीत शिवाय ते जास्त काळ कुरकुरीत राहतात आणि चवीसाठी बनतात, चला तर मग जाणून घेउया परफेक्ट उडीद वडे बनवण्याची (Kitchen Tips) ही खास रेसिपी…
साहित्य (Kitchen Tips)
पोहे, तांदळाचे पीठ, आलं, हिरवी मिरची, कडीपत्ता, जिरं, पाणी आणि तेल
कृती
ही कृती बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये दोन कप उडीद डाळ घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी घालून उडीद डाळ स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. त्यानंतर उडीद डाळीमध्ये पुन्हा दोन कप पाणी घालून त्यावर झाकण ठेवा. पाच ते सहा तासांसाठी ही डाळ तुम्हाला भिजत घालायची आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घ्या. त्यात थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यामध्ये थंड पाणी घाला. डाळीची पेस्ट तयार झाल्यानंतर परातीत काढून घ्या. एका बाऊलमध्ये एक कप पोहे घ्या. त्यात पाणी घालून धुवून घ्या. पोहे भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या व त्याची पेस्ट तयार करा. आता तयार पोह्याची पेस्ट उडीद डाळीच्या पेस्ट (Kitchen Tips) मध्ये घालून मिक्स करा. त्यानंतर एक चमचा तांदळाचे पीठ घालून मिक्स करा आता त्यामध्ये किसलेलं आलं, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरे आणि कढीपत्ता घालून साहित्य हाताने मिक्स करा.
आता आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. हातावर बॅटर घेऊन मेंदू वाड्याचा (Kitchen Tips) आकार द्या. गरम तेलात सोडून दोन्ही बाजूला खरपूस भाजून घ्या अशा प्रकारे कुरकुरीत मेदू वडे खाण्यासाठी तयार होतील.
(टीप : वडे बनवत असताना हातावर पाणी घ्यायला विसरू नका. त्यामुळे वेळेचा आकार छान बनवता येतो.)