Kitchen Tips : खरंतर खाण्यापिण्याची कुठलीही वस्तू म्हटलं की त्याची एक्सपायरी डेट आपण आधी पाहतो आणि मग अशा वस्तू विकत घेतो. त्यानंतर त्याची एक्सपायरी डेट संपली की त्या वस्तू आपण टाकून देतो. विशेषतः लहान मुलांमध्ये सॉसेस, जॅम यासारख्या ज्या गोष्टी असतात ह्या अगदी आपण त्याची एक्सपायरी डेट बघून घेतो आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून त्या कालावधीत मध्येच त्या मुलांना त्या गोष्टी खायला देत असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का किचनमध्ये अशा काही गोष्टी असतात त्या बऱ्याच काळ टिकून राहतात अगदी त्याची एक्सपायरी डेट संपली तरी सुद्धा अशा वस्तू (Kitchen Tips) टिकून राहतात. या वस्तू कोणत्या आहेत बरं चला जाणून घेऊया…
मध
नैसर्गिकरीत्या मध तयार झालेला असतो. हा मध आपल्यापर्यंत जेव्हा पोहचतो तेव्हा तो वेगवेगळ्या प्लास्टिक डब्यांमधून घरापर्यंत येत असतो. या डब्यांवर या मधाची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. मात्र हे लक्षात घ्या की नैसर्गिकरीत्या तयार झालेला मध कधीही एक्सपायर होत नाही. कधीही खराब होत नाही. त्यामुळे तुम्ही डोळे झाकून हा मध वापरू शकता. बिनधास्त तुमच्या मुलांनाही (Kitchen Tips) देऊ शकता. कधी कधी हिवाळ्याच्या दिवसात देखील मधातली साखर तळाशी येऊन बसते. त्यामुळे मध खराब आहे असा समज होतो. मात्र केवळ मध गोठल्यामुळे त्यातली जी शर्करा असते आपण म्हणतो ती खाली येते त्यामुळे आपल्याला मधात साखर जमा झाल्यासारखे दिसते तो मध खराब झालेला नसतो.
सोया सॉस (Kitchen Tips)
चायनीज कोणताही पदार्थ करायचा म्हटलं तर सोयासॉस हे आलंच. घरच्या घरी (Kitchen Tips) फ्राईड राईस, नूडल्स, मंचुरियन अशा गोष्टी बनवण्यासाठी आपण सोयासॉस सर्रास वापरतो. तो देखील एक्सपायर झाला असेल तर तुम्ही फेकून देत असाल तर तसं करू नका कारण सोयासॉस हा कधीच खराब होत नाही.
व्हिनेगर
विनेगर हे एक प्रकारचं आम्ल आहे. कोशिंबिरी, लोणचं यासाठी तर पॅकेट (Kitchen Tips) फुल असलेल्या टोमॅटो केचप, सॉस, मेयोनीस मध्ये विनेगर चा वापर केला जातो. एवढेच नाही तर हल्ली स्वच्छतेसाठी देखील व्हिनेगर वापरले जातं. हे विनेगर कधीही खराब होत नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हिनेगर हे योग्य प्रकारे साठवलेलं असावं.
कॉर्नफ्लोर (Kitchen Tips)
जर कॉर्नफ्लोर तुम्ही व्यवस्थित साठवून ठेवलं तर ते खराब होत नाही. कॉर्नफ्लोर (Kitchen Tips) ठेवत असताना शक्यतो हवाबंद काचेच्या डब्यात ठेवा म्हणजे त्याला किडे लागणार नाहीत आणि कॉर्नफ्लोर कधी खराब होणार नाही.