Kitchen Tips : महाराष्ट्रीयन सण उत्सवाला पुरीचा बेत नेहमी आखला जातो. श्रीखंड पुरी , आमरस पुरी , पुरी बासुंदी , पुरी भाजी असे पदार्थ नेहमी बनवले जातात. मात्र अनेकदा पुरी बनवली की तेल खूप ओढते. त्यामुळे अगदीच पुरी हातात धरली तरी हाताला तेल लागते. अशा तेलांनी माखलेल्या पुऱ्या म्हणजे मग अनेक आजरांना निमंत्रण . म्हणूनच हल्ली पुरी बनवण्याचे टाळले जाते. मात्र आज आम्ही आजच्या लेखात (Kitchen Tips) अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे पुऱ्या तेलकट होणार नाहीत.
पुरीसाठी कणिक कशी भिजवायची ?(Kitchen Tips)
- ज्याप्रकारे चपाती मळण्यासाठी आपण कणिक मळतो त्याच प्रकारे पुरी बनवण्यासाठी सुद्धा कणिक (Kitchen Tips) मळायची आहे मात्र चपाती बनवण्यासाठी आपण सैलसर कणिक मळतो पण फोडी बनवण्यासाठी घट्ट कणिक मळावी लागेल.
- पुरी बनवण्यासाठी कणिक मळताना दोन वाट्या गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ (Kitchen Tips) घालून मिक्स करा. साखरेमुळे कणिक पांढर राहील तर मिठामुळे पुऱ्या चविष्ट होतील.
- आता गव्हाच्या पिठामध्ये अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घालून मिक्स करा. पाणी आणि दूध हळूहळू घालत (Kitchen Tips) कणीक मळून घ्यायची आहे आणि हे कणिक घट्ट मळायचे आहे.
- त्यानंतर कणिक मळून झाल्यानंतर त्याला ब्रशने तेल लावा.
- आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. कणकेचा गोळा घ्या पुऱ्या लाटून घ्या आणि गरम तेलात सोडून (Kitchen Tips) पुऱ्या तळून घ्या.
- पुऱ्या तळत असताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवावा. पुऱ्या ब्राऊन होईपर्यंत तळून घ्याव्यात. तळलेल्या पुऱ्या चाळणीमध्ये काही वेळासाठी काढून ठेवा अशाप्रकारे कमी तेलकट पुऱ्या (Kitchen Tips) तयार होतील.