Kitchen Tips : भारतीय आहार पद्धतीमध्ये चपाती, भाकरी, फुलके हे आवर्जून बनवले जातात. मात्र अनेकदा चपाती ,पोळी, फुलके अशा गोष्टी खाल्ल्यामुळे पोट गच्च झाल्यासारखे वाटते. शिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंद होत असल्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. अशा स्थितीत पोट विकार आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठतेमुळे पोट फुगणे, पोटदुखी, आंबट ढेकर येणे, मळमळ यासारख्या (Kitchen Tips) समस्या ही उद्भवतात.
जर आपण यावर वेळीच उपाय केले नाहीत तर फिशर किंवा मूळव्याध यासारख्या तक्रारी पुढे वाढू लागतात. मात्र आपण चपाती आपल्या आहारामधून अवॉइड करू इच्छितो नसाल तर चपातीची कणिक मळताना दोन गोष्टी त्यामध्ये तुम्ही घालू शकता जेणेकरून (Kitchen Tips) चपाती पचायला हलकी होते आणि त्यामुळे पोटाला कोणताही त्रास होत नाही चला तर मग जाणून घेऊया…
चपाती खाल्ल्यानंतर जर तुम्हाला बद्धकोष्ठता होत असेल किंवा पोटफुगीची समस्या होत असेल तर कणिक मळत असताना केवळ दोन गोष्टी मिक्स करा आणि त्यानंतर तुम्हाला ही समस्या होणार नाही. त्यामुळे चपाती ही पचायला हलकी होऊन (Kitchen Tips) जाईल आणि बद्धकोष्ठतेची समस्या तुम्हाला येणार नाही.
ओट्स (Kitchen Tips)
ओट्स मध्ये फायबर, विटामिन बी, आयर्न, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे संतुलित घटक असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय ओट्स मध्ये बीटा ग्लुकोज असते जे आतडे स्वच्छ करण्याचे काम करते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
ओवा (Kitchen Tips)
अगदी आपल्या पूर्वजांच्या काळापासून पोटाच्या समस्यांसाठी ओवा हा आवर्जून खाल्ला जातो. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कणिक मळताना त्यामध्ये ओवा घाला. ओव्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अंटीबॅक्टरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे आतडे निरोगी राहतात. शिवाय तुमच्या चपातीला एक छानशी चव सुद्धा मिळते. त्यामुळे नियमितपणे कणिक मळताना (Kitchen Tips) तुम्ही ओवा घालून चपात्या करू शकता.