पावसाळ्यात कडधान्यांना लागते कीड, चिप्स, बिस्कीटे मऊ पडतात ? वापरा ‘या’ सोप्या टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पावसाळा हा जितका अल्हाददायक असतो तितका काही पदार्थांसाठी हा मारक ठरतो. कारण पावसाळ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येत नसल्यामुळे पावसाळ्यात दमटपणा हा प्रचंड प्रमाणात वाढतो. त्यामुळे घरातले काही पदार्थ हे आवर्जून खराब होतात. विशेषतः कडधान्य आणि मसाले याशिवाय खाऊचे पदार्थ खराब होतात. म्हणूनच आज आम्ही काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे हे पदार्थ टिकून राहतील. चला तर मग जाणून घेऊयात…

बिस्किटे

पावसाळ्याच्या दिवसात दमट हवेमुळे बिस्कीट पटकन मऊ पडतात. काही वेळेला ही बिस्कीट तुम्ही डब्यात जरी भरून ठेवली असली तरी सुद्धा डबा आतून ओलसर होतो. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या सिलिका पॅकेट्सचा वापर करा. त्यामध्ये जास्तीत जास्त ओलावा शोषून घेतला जातो. जर तुम्हाला बिस्किट दीर्घकाळ टिकवून ठेवायची असतील तर झाकणाच्या आतील बाजूस हे पॅकेट टेपने चिकटवून ठेवा त्यामुळे कॉफी, मीठ, बेसन आणि बिस्किटांपासून ओलावा दूर राहतो.

मसाले

पावसाच्या दिवसात मसाले आणि डाळींच्या डब्यामध्ये ओलावा आल्यामुळे बुरशी येते किंवा मसाले आणि डाळी यांना कीड लागतात किंवा ते मऊ होतात. यावर उपाय करण्यासाठी टिशू पेपर मध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि गुंडाळा आता डब्या मध्ये असे टिशू पेपर ठेवल्याने त्यामध्ये ओलावा येणार नाही.

कडधान्य

पावसाळ्यात एक मोठी समस्या उद्भवते ते म्हणजे कडधान्यांना कीड लागते. एवढेच नाही तर तांदूळ रोजच्या वापरातल्या डाळी अशा पदार्थांना सुद्धा लवकर कीड लागलेली दिसते. जर किडीपासून कडधान्याला वाचवायचं असेल तर डाळीत किंवा कडधान्यांमध्ये तमालपत्र किंवा कडुनिंबाची पानं ठेवा.

चिप्स किंवा वेफर्स

कोणत्याही डब्यात टिशू पेपर ठेवला आणि त्यानंतर त्यामध्ये चिप्स किंवा इतर स्नॅक्स ठेवली तर त्यामध्ये ओलावा येणार नाही आणि पदार्थ आहे तसे कुरकुरीत राहतील.

साखर

साखरेच्या डब्याला हमखास मुंग्या लागतात. साखरेच्या डब्यामध्ये लवंग ठेवा. लवंगाच्या वासाने मुंग्या लागत नाहीत. पावसाळ्यात अन्नपदार्थांमध्ये ओलावा येऊ नये म्हणून अन्नपदार्थ हवाबंद डब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा.