Kiwi Fruit Cultivation | किवी लागवडीतून शेतकऱ्यांना मिळेल भरघोस नफा; बाजारात वाढलीये मोठी मागणी

Kiwi Fruit Cultivation
Kiwi Fruit Cultivation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kiwi Fruit Cultivation | आजकाल अनेक लोक शेती या व्यवसायाकडे वळालेले आहेत. अनेक तरुण देखील नोकरी करण्याऐवजी शेती करण्याला प्राधान्य देतात. कारण आता यांत्रिकीकरणाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे या सगळ्याचा वापर करून शेती करणे खूप सोपे झालेले आहे. त्याचप्रमाणे आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. यामध्ये शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवीन उत्पन्न घेतले जाते. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका पीकाबद्दल सांगणार आहोत. ज्या पिकाची लागवड करून तुम्ही खूप चांगली कमाई करू शकता.ते पीक म्हणजे किवी . तुम्ही किवीची लागवड करून चांगला नफा मिळवू शकता.

भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, केरळ, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय यांसारख्या राज्यांमध्ये कीवीची (Kiwi Fruit Cultivation) लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे तुम्ही देखील किवीची लागवड करून चांगली कमाई करू शकता.

किविची लागवड कशी करावी?

या किवीची लागवड प्रामुख्याने हिवाळ्याच्या हंगामात केली जाते. यासोबतच रोपाच्या पूनरोपणाला देखील सुरुवात केली जाते. यामध्ये खोल सुपीक वालुकामय चिकन मातीचा चांगला निचरा झाला असणे गरजेचे असते. अशी माती वापरली, तर ती तुमच्या पिकासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

किविची फायदे | Kiwi Fruit Cultivation

किवी हे फळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. हे एक अँटिऑक्सिडंट आहे. त्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, पोटॅशियम, तांबे आणि सोडियम या प्रकारचे गुणधर्म असतात. त्यामुळे आपले रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. म्हणूनच किवीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचप्रमाणे किवीचे फळ जास्त किमतीने विकले जाते

कमाई किती होईल

किवीला भारतीय बाजारपेठेत प्रति 35 दराने विकले जाते. जिथे तुम्हाला चांगल्या नफा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही किवीची लागवड करून चांगला पैसा कमवू शकता.