मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 18 ऑगस्टपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी संघाची घोषणा केली होती. त्यावेळी दुखापतीमुळे लोकेश राहुलचा (KL Rahul) संघात समावेश करण्यात आला नव्हता. पण आता लोकेश राहुलनं (KL Rahul) फिटनेस टेस्ट पास केल्यामुळे त्याला भारतीय संघात जागा देण्यात आले एवढेच नाहीतर कर्णधारपदाची धुराही राहुलकडे (KL Rahul) देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपद धवनकडे देण्यात आलं आहे.
NEWS – KL Rahul cleared to play; set to lead Team India in Zimbabwe.
More details here – https://t.co/GVOcksqKHS #TeamIndia pic.twitter.com/1SdIJYu6hv
— BCCI (@BCCI) August 11, 2022
आशिया चषक संघात समावेश
या महिन्याच्या अखेरीस संयुक्त अरब अरब अमिरातीत खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतही लोकेश राहुल (KL Rahul) भारतीय संघाचा उपकर्णधार असणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या मालिकेआधी झिम्बाव्बे दौरा ही राहुलसाठी चांगली संधी ठरावी. यासाठी त्याच्याकडे (KL Rahul) संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातल्या तीन वन डे सामन्यानंतर तो आशिया चषकासाठी यूएईला रवाना होणार आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ
लोकेश राहुल (कर्णधार)(KL Rahul), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर
झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक
18 ऑगस्ट – पहिली वन डे, हरारे स्पोर्टस क्लब
20 ऑगस्ट – दुसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब
22 ऑगस्ट – तिसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब
मालिकेतले तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वा. सुरु होतील.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर