भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. प्रत्येक लहान-मोठ्या शहराला जोडणाऱ्या या प्रणालीत काही स्टेशनं खास ओळख निर्माण करतात. असंच एक खास रेल्वे स्टेशन म्हणजे मथुरा जंक्शन, जिथून भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात थेट ट्रेन उपलब्ध आहे. IRCTC वर शोधा आणि स्वतः खात्री करा
देशाच्या चारही दिशांसाठी थेट ट्रेन
मथुरा जंक्शन हे भारतातील एकमेव असं रेल्वे स्टेशन आहे जिथून उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम – सर्व दिशांमध्ये थेट ट्रेन उपलब्ध आहेत.
उत्तर – जम्मू-कश्मीर, दक्षिण – कन्याकुमारी, केरल पूर्व – ओडिशा, बिहार पश्चिम – राजस्थान, गुजरात
दररोज 200 पेक्षा जास्त ट्रेनचा थांबा
मथुरा जंक्शनवर दररोज 200 पेक्षा जास्त रेल्वेगाड्या थांबतात. यामध्ये प्रीमियम गाड्या जसं की राजधानी, शताब्दी, दुरंतो यांचा समावेश आहे.
यामुळे प्रवाशांना अनेक पर्याय आणि वेळा उपलब्ध होतात, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होतो.
1875 पासून रेल्वेसेवा सुरू
मथुरा जंक्शनवर रेल्वे सेवा 1875 मध्ये सुरू झाली आणि आज हे उत्तर मध्य रेल्वेचा एक महत्त्वाचा भाग आहे. इथले 10 प्लॅटफॉर्म्स आणि उत्कृष्ट सुविधा हे स्टेशन देशातील सर्वात सुसज्ज स्टेशन्सपैकी एक बनवतात.
प्रत्येक राज्यासाठी थेट ट्रेन उपलब्ध
मथुरा जंक्शनवरून दिल्ली, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये थेट ट्रेन चालतात. त्यामुळे तुम्हाला कनेक्टिंग ट्रेनचा त्रास न घेता थेट गंतव्यावर जाता येतं.
जर तुम्ही अशा ठिकाणी रेल्वे प्रवास करायचा विचार करत असाल जिथून देशभर थेट पोहोचता येईल, तर मथुरा जंक्शन ही योग्य निवड आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी, प्रचंड ट्रेनचे ऑप्शन, आणि देशाच्या प्रत्येक राज्यात थेट पोहोचण्याची क्षमता यामुळे हे स्टेशन विशेष महत्त्वाचं ठरतं. पुढच्या प्रवासासाठी IRCTC वर मथुरा जंक्शन तपासा आणि स्वतः अनुभव घ्या




