निवृत्तीनंतर महिन्याला मिळतील 2.50 लाख रुपये; अशाप्रकारे करा गुंतवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच जाणार आहे. आणि या सगळ्यात अनेक लोक भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. भविष्यात जाऊन आणीबाणीच्या काळात आपल्याला आर्थिक गरज असल्यास आपली गुंतवणूक आपल्या कामाला येईल. यासाठी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. तसेच अनेक लोक सेवानिवृत्तीचे देखील नियोजन करत असतात. परंतु यासाठी किती गुंतवणूक कराव कुठे गुंतवणूक करावी? यांसारखे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. परंतु तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. जेणेकरून तुम्हाला निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळेल. आणि तुमच्या आयुष्य तुम्हाला चांगले जमता येईल.

तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल इतक्या लवकर तुम्हाला परतावा मिळेल. आणि खूप चांगला परतावा मिळेल. तुमच्या निवृत्तीसाठी सर्वात सुरक्षित योजना म्हणजे एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम याद्वारे तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करा. आणि निवृत्तीनंतर तुम्हाला जवळपास 5 कोटी रुपये मिळतील. आता तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी बचत करून निवृत्तीनंतर 2.5 लाख रुपये पेन्शन कसे मिळवायचे? याबद्दल आपण जाणून घेऊया.

जर तुम्ही नुकतीच नोकरी करायला सुरुवात केली असेल, तर हा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला जर तुमच्या निवृत्तीनंतर 5 कोटी रुपये जमा करायचे असेल, आणि तुम्हाला 25 व्या वर्षी नोकरी मिळाली, तर तुम्ही तुमच्या पगारातून दररोज 442 वाचायला सुरुवात करा. आणि ती रक्कम एनपीएस या योजनेमध्ये गुंतवा. त्यानंतर निवृत्तीनंतर 5 कोटी रुपये सहज जमा होते. तुम्ही जर या योजनेमध्ये दर रोज 442 गुंतवले, तर तुम्ही दर महिना 13,260 रुपये जमा होतील आणि अशा पद्धतीने तुम्ही व्हायच्या 25 वर्षापासून सुरुवात केली, तर 60 व्या वर्षापर्यंत ही गुंतवणूक होईल. यामध्ये तुम्हाला 10 टक्के व्याज मिळेल आणि चक्रवाढ व्याज तुम्हाला साठाव्या वर्षी 5.12 कोटी रुपये मिळतील.

या योजनेतून तुम्ही निवृत्तीनंतर केवळ 60% रक्कम काढू शकता. याचा अर्थ तुम्ही 3 होती रुपये काढू शकता. आणि उरलेले दोन कोटी रुपये तुम्हाला वार्षिक योजनेतून गुंतवावे लागेल. म्हणजे तुमचा संपूर्ण गुंतवल्यास तुम्हाला दर महिन्याला भरपूर पैसे देखील मिळेल. या मध्ये तुम्हाला जवळपास पाच ते सहा टक्के दराने व्याज मिळेल. म्हणजेच 5.12 कोटींवर तुम्हाला दर महिन्याला 25.60 ते 30. 72 लाख रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात अत्यंत आनंदाने जगू शकता. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण देखील येणार नाही. यासाठी जर तुम्ही आजपासून एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल.