हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आज आलेलो आहोत. ती म्हणजे आता शेतकऱ्यांना पीएम पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरावा लागतो. ती अर्ज भरण्याची तारीख वाढविण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे. आणि आर्थिक सुरक्षा मिळावी. यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
शेतकऱ्यांनी जर त्यांच्या पिकांचा हा पिक विमा काढला, जर कोणत्याही प्रकारची आपत्ती व दुष्काळ आला तर पिकांचे नुकसान झाल्यावर त्यांना आर्थिक भरपाई मिळते. रब्बी हंगामासाठी हरभरा, गहू, जवस, मसूर आणि मोहरी ही पिके पिक विमामध्ये समाविष्ट आहेत.
अर्ज कसा कराल?
तुम्हाला जर पीक मिळण्यासाठी बँकेच्या शाखेतून अर्ज करायचा असेल, तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन शकता आणि अर्ज करू शकता. किंवा अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता.
कागदपत्रे
या पीएम पीक विमा नोंदणीसाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो कॉपी आणि जमिनी संबंधित कागदपत्र असणे गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्हाला पीक विम्यासाठी अर्ज करता येईल.सरकारची प्रधानमंत्री फसल वीमा योजना ही एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक लोकांना फायदा झालेला आहे. जर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली आणि तुमच्या पिका प्रधानमंत्री फसल विमा योजना ही एक कल्याणकारी योजना आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी जास्तीत जास्त दोन टक्के, रब्बी आणि तेलबिया पिकांसाठी दीड टक्के आणि व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी पाच टक्के वार्षिक प्रीमियम भरावा लागतो. उर्वरित प्रीमियमची रक्कम केंद्र आणि राज्य सरकारांनी समान प्रमाणात विभागली जाते.