Sunday, April 2, 2023

Kojagiri Purnima 2022 : काय आहे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व? कशी करतात साजरी?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अश्विन महिन्याच्या (Kojagiri Purnima 2022) शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. सर्व पौर्णिमांमध्ये या पौर्णिमेला विशेष स्थान आहे कारण या तिथीला देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि घरोघरी फिरते असे मानले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. चला तर मग आजच्या लेखात आपण कोजागिरी पौर्णिमेचे महत्व आणि ती कशी साजरी करतात याबाबत जाणून घेऊया…

Kojagiri Purnima 2022

- Advertisement -

महत्त्व-

कोजागिरी पौर्णिमेच्या (Kojagiri Purnima 2022) रात्री भगवान इंद्र लक्ष्मी, चंद्र व कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानलं जाते कि, कोजागिरी पौर्णिमला या देवता देवलोकातून पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि लोक त्यांना प्रसन्न करण्यासाठी जागरण करून आटवलेल्या अमृत स्वरूप दुधाचा नैवेद्य या देवतांना दाखवून प्रसन्न करतात म्हणून कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. कोजागरी पौर्णिमाच्या रात्री लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केल्यास लक्ष्मी प्राप्त होते अशी मान्यता आहे.

Kojagiri Purnima 2022

 कशी करतात साजरी?- (Kojagiri Purnima 2022)

यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही 09 ऑक्टोबर 2022 ला रविवारी आहे. संध्याकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी कोजागिरी पौर्णिमेची सुरुवात होणार आहे. या दिवशी (Kojagiri Purnima 2022) दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या दुधाचे सेवन केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते. हे दूध त्वचेच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही लाभदायक असते. डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनाही या दुधाचा फायदा होतो. याशिवाय अनेक अर्थांनी हे विशेष मानले जाते