चोरटयांनी हालेवाडीतील मंदिरातून 14 तोळे सोने केले लंपास, पकडले जाण्याच्या भीतीने सीसीटीव्ही कॅमेराही पळवला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील हालेवाडी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चोरटयांनी चक्क मंदिरातील 14 तोळे सोने लंपास (gold was stolen from a temple) केले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे मंदिर भर वस्तीमध्ये असूनसुद्धा चोरी (gold was stolen from a temple) झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजरा तालुक्यातील हालेवाडी गावात चोरट्यांनी लक्ष्मी मंदिरातील मूर्तीवरचे दागिने चोरून (gold was stolen from a temple) नेले. चोरी करून चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा देखील पळवून नेली आहे.

गावात लक्ष्मी मंदिरात चोरी झाल्याने एकच खळबळ
आजरा तालुक्यातील हालेवाडी गावात लक्ष्मी मंदिरात चोरी (gold was stolen from a temple) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारण हे मंदिर भर वस्तीमध्ये असूनही चोरी झाल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरट्यांनी मूर्तीवरील 14 तोळे दागिने चोरले आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्थांकडून या मंदिरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, चोरट्यांनी दागिन्यांसोबतच मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा देखील नेली आहे.

पोलिसांपुढे मोठे आव्हान
चोरांनी चोरी (gold was stolen from a temple) करत तब्बल 14 तोळे सोने पळवले. मात्र, सोबत मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा देखील नेली आहे. त्यामुळे या चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरु आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर