Kolhapur Airport : कोल्हापूरकरांसाठी खुशखबर!! बंगळूर- कोल्हापूर- मुंबई विमानसेवा रोज सुरु राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रस्ते, रेल्वे सोबतच हवाई मार्गानेही देशातील सर्व कानाकोपऱ्यातील शहरे एकेमकांना जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रत्येक राज्यातील प्रमुख ठिकाणी विमानतळे उभारण्याचे काम केले जात आहे. तसेच या विमानतळवरून सामान्यांना विमानसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. याच प्रयत्नातून कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) आता कोल्हापूरकरांसाठी “कोल्हापूर ते मुंबई” आणि “कोल्हापूर ते बेंगलोर ” अशी विमानसेवा आता दररोज उपलब्ध होणार आहे. बंगळूर- कोल्हापूर- मुंबई मार्गावर आता रोज विमाने उडणार आहेत. बंगळूर आणि मुंबई अशा देशातील २ मुख्य शहरांना सहजपणे जोडण्यासाठी ही विमानसेवा अतिशय महत्वाची मानली जात आहे.

कस असेल वेळापत्रक – Kolhapur Airport

भारतात आपला विमानसेवेचा विस्तार करू बघत असलेल्या स्टार एअरलाईनद्वारे ही सेवा सुरु केली जाणार आहे. स्टार एअरलाईन्सने विमानसेवा ही येत्या 15 ऑक्टोबरपासून आठवड्यातील सातही दिवस सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमान प्रवाश्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. स्टार एअरलाईनचे हे विमान सकाळी बंगलोर येथून 9:05 मि. निघेल जे की 10:20 वाजता कोल्हापूरला पोहचेल तेच विमान कोल्हापूरहुन मुंबई साठी 10:50 वाजता निघून 11:50 ला मुंबईला पोहचेल. परतीच्या प्रवासात स्टार एअरलाईनचे विमान 3 वाजून 40 मिनिटांनी मुंबईवरून निघून 4 वाजून 40 वाजता कोल्हापूरला पोहचेल. तसेच 5:10 वाजता कोल्हापूर वरून बंगलोरसाठी उड्डाण घेईल.

याआधी कसा होता टाइम-

यापूर्वी बंगळूर- कोल्हापूर- मुंबई मार्गावर जाणारी विमान सेवा आठवड्यातून चार दिवस म्हणजेच मंगळवार, बुधवार , गुरुवार, आणि शनिवारी सुरु होती. परंतु आता अन्य दिवशीही स्टार एअरलाईनच्या माध्यमातून मुंबई आणि बंगलोर साठी विमानसेवा पुरवली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) दररोज मुंबईसाठी विमानसेवा उपलब्ध असेल.

पर्यटनाबरोबरच उद्योगालाही मिळणार चालना

स्टार एअरलाईनच्या ह्या निर्णयामुळे कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकास सात दिवसात केव्हाही येता येऊ शकेल. केवळ कोल्हापूरच नव्हे तर मुंबई आणि बंगलोरलाही ह्याचा फायदा होणार आहे. तसेच पर्यटनाबरोबरच उद्योगिक बाबीलाही चालना मिळेल हे मात्र नक्की.