कोल्हापुरात यंदा 10 नेते फिक्स आमदार होतायत…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर लोकसभेचा निकाल अपेक्षित असाच लागला… काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात तब्बल दीड लाखांचं लीड मिळवत दणक्यात विजय मिळवला… कोल्हापूरच्या जनतेनं पुन्हा एकदा पुरोगामी काँग्रेसी वारसा या निकालातून पुढे चालवला…अनेक जाती-जमातींचं मिश्रण असणाऱ्या कोल्हापुरात निवडणुकीसाठी अनेक खाचाखुणा महत्त्वाच्या ठरतात… इथलं गटातटांचं राजकारण कधी कुठे झुकेल याचा आपल्यालाही अंदाज लागत नाही… कारखानदारी वाढलेल्या या पाणीदार पट्ट्यात लोकसभेपेक्षा जास्त चर्चा असते ती विधानसभेची… एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल 10 आमदार निवडून जात विधिमंडळात प्रतिनिधित्व करतात… दोन लोकसभांनी म्हणजेच कोल्हापूर आणि हातकणंगले या दोघांनी मिळून कोल्हापूर जिल्हा तयार होतो…यात सुरुवातीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी आणि इतर काही स्थानिक पक्ष आपलं वजन ठेवून आहेत…पक्षात पडलेल्या फाटा फुटींमुळे आता कोल्हापूरमधल्या अनेक मतदारसंघाच्या लढती इंटरेस्टिंग ठरतील… बाकी भाजपला यंदाही कोल्हापुरात आपला आमदार निवडून आणण्यासाठी चाचपडतच राहावे लागणार का? याचंही उत्तर विधानसभेमुळे मिळणार आहे… त्यामुळे चंदगड ते शिरोळ कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत आमदार म्हणून कोण जिंकून येतोय? स्थानिक जनतेचा कौल कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे? आणि लोकसभेचा विधानसभेच्या निवडणुकीवर कोल्हापुरात कसा इम्पॅक्ट पाहायला मिळेल? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

सर्वात पहिला मतदारसंघ येतो तो कोल्हापूर दक्षिण विधानसभा

महाडिक विरुद्ध पाटील असा इथला कडवा संघर्ष. २००९ साली सतेज पाटील इथून आमदार झाले… पण २०१४ च्या मोदी लाटेत नव्या नवख्या अमल महाडिकांकडून त्यांचा पराभव झाला. याचाच वचपा सतेज पाटलांनी २०१९ च्या निवडणुकीत काढला आपला पुतण्या ऋतुराज पाटील याला मैदानात उतरवत सतेज पाटील यांनी निवडून आणलं… त्यामुळे येणाऱ्या विधानसभेलाही कोल्हापुर दक्षीणमधून पाटील विरुद्ध महाडिक यांच्यातला राजकीय विस्तव पहायला मिळेलच. पण महाडिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला पिंजून काढलेल्या मतदारसंघाचा परिणाम म्हणूनच की काय कोल्हापूर दक्षिणमधून शाहूंना अवघं ६ हजारांचं निसटतं मताधिक्य मिळवलं.. त्यामुळे येणाऱ्या आमदारकीला इथे पाटील अन् महाडिक यांच्यात काटाजोड लढत होण्याची शक्यता जास्त आहे… पण सतेज पाटलांच्या किलर इंस्टींटमुळे ऋतुराज सलग दुसरी टर्म निवडून येतील, असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे…

YouTube video player

दुसरा मतदारसंघ आहे कोल्हापूर उत्तरचा…

उत्तर कोल्हापुर मतदारसंघात पेठांची भूमिका निर्णायक ठरते… यामध्ये शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ येथील मतदारांच्या हातात ही शेवटची मतं असतात, असं बोललं जातं.. २०१९ मधील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करून हा मतदारसंघ काँग्रेसने ताब्यात घेतला… तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी इथून विजय मिळवला… कसबा बावड्यातील एकगठ्ठा मतदान, काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची ताकद आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याबद्दल असणारी लोकांमधील आपुलकी यामुळे काँग्रेसला यंदाही विधानसभा सोपी जाईल असं बोललं जातंय…पण पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार नाना कदम यांनी तब्बल ७८ हजार मते घेतली होती. त्यामुळे भाजपची कोल्हापूर उत्तर मधील ताकद वाढल्याचंही दिसतंय… महायुतीकडून कदम की क्षिरसागर असा तीढा कायम असताना काँग्रेसकडून मात्र जयश्री जाधव यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत…

तिसरा मतदारसंघ आहे तो करवीर विधानसभा

नुकतंच निधन झालेले काँग्रेसचे पी.एन. पाटील हे करवीरचे सर्वाधिक काळ आमदार राहीले. लोकसभेला शाहू छत्रपतींना कोल्हापूरातून सर्वाधिक लीड मिळालं ते याच करवीर मतदारसंघातून… पण निकालाच्या आधीच पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इथून त्यांचे पारंपारिक विरोधक आहेत चंद्रदीप नरके. ते सध्या शिवसेना शिंदे गटात असल्यानं इथून राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके असा आमदारकीला सामना होण्याची शक्यता आहे.. पण सहानुभूतीची लाट, काँग्रेसची मजबूत पक्षबांधणी आणि शाहूंनी जो लावलाच तर येणाऱ्या विधानसभेला करवीरमधून काँग्रेसचा आमदार आरामात निवडून येऊ शकतो..

आता येतो चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कागल विधानसभा..

हा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मतदारसंघ. इथलं राजकारण राजकीय पक्षांपेक्षा गटातटांच्या राजकारणावर अधीक अवलंबून असतं.. हसन मुश्रीफ यांनी कागलमधून तब्बल सहा वेळा बाजी मारलीय. त्यामुळे कागल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो… विक्रमसिंह घाटगे यांनी तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनीधीत्व केलेलं आहे.. पण त्यांचे सुपुत्र समरजितसिंग घाटगे यांनी मुश्रीफांच्या विरोधात अनेकदा लझत देऊनही त्यांना या मतदारसंघात उभारी घेता आलेली नाहीये.. पण आता प्रोब्लेम असा झालाय की कागल मधील हे दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धीच महायुतीत असल्याने तिकीट वाटपात कागलसाठी जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता आहे. मुश्रीफांना जर तिकीट मिळालं तर घाटगे यांच्यासाठी शरद पवार गटाचा पर्यायही खुला राहतो.. पण सध्यातरी इथे मुश्रीफांचीच ताकद जास्त असल्याने तेच यंदाही आमदार असतील, असं राजकीय जाणकार सांगतायत..

पाचवा मतदारसंघ आहे तो राधानगरीचा…

काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा राधानगरी मतदारसंघ 2014 पासून शिवसेनेकडे शिफ्ट झाला… शिवसेनेचे प्रकाश आबिटकर इथून सलग दोनदा निवडून आले… मात्र शिवसेना फुटीनंतर शिंदे गटासोबत गेल्यामुळे आबिटकरांच्या विरोधात सामान्य शिवसैनिक नाराज आहेत… त्यात त्यांचे पारंपारिक विरोधक असणारे के. पी. पाटील हे अजित दादा गटात असले तरी त्यांची शरद पवार गटाशी जवळिक वाढली आहे. त्यामुळे जर का पाटील यांनी तुतारी हातात घेतली तर इथून आबिटकर विरुद्ध के. पी पाटील अशी अटीतटीची लढत होईल. बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे मात्र इथून कोण सरशी मारेल याचा अंदाज आत्ताच बांधता येणार नाही..

सहावा मतदारसंघ आहे तो चंदगडचा…

अजित पवार गटात असणारे राजेश पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत.. २०१९ च्या निवडणुकीत फडणवीसांच्या जवळच्या गोटातील समजल्या जाणाऱ्या शिवाजी पाटील यांनी कडवी झुंज दिली होती… यंदा लोकसभेला केलेल्या कामाची पावती म्हणून राजेश पाटील यांना संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफ मदतीचा हात देतील… त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी गटाकडून नंदिनी बाभुळकर तर काँग्रेसकडून विनायक पाटील निवडणुकीत उतरु पाहतायत.. पण ग्राऊंडचा अभ्यास करुन पाहिल्यास राजेश पाटील यांचंच पारडं इ़थं जड असल्याचं सध्यातरी बोललं जातंय..

सातवा मतदारसंघ आहे शाहुवाडी विधानसभा

शाहुवाडीचे विद्यमान आमदार आहेत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे. त्यांच्या विरोधात यंदाही पारंपारिक विरोधक आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्याजित आबा सरुडकरच लढत देताना दिसतील… मागील चार टर्मचा विचार केला तर प्रत्येकी दोन टर्म या दोन्ही नेत्यांनी गाजवल्या आहेत… मात्र यंदा लोकसभेला लढत दिल्यामुळे सत्यजित आबा पाटील यांना मिळालेली सहानुभुती, शिवसेना फुटीचा परिणाम आणि ठाकरेंनी ताकद लावली तर इथून सत्यजित आबा पाटील यांचे जिंकण्याचे चांसेस वाढतायत..

आठवा मतदारसंघ आहे तो हातकणंगले विधानसभा…

काँग्रेसचे राजू आवळे हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.. २००९ आणि २०१४ मध्ये इथून सुजित मिंचेकर यांनी शिवसेनेकडून सलग विजय मिळवला होता. मात्र २०१९ मध्ये आवळे यांनी त्यांना मात देत आमदारकी पटकावली… सद्यस्थितीचा विचार करायचा झाल्यास मिंचेकर शिवसेनेच्या नेमक्या कोणत्या गटात आहेत याचा खुलासा झालेला नाहीये. त्यामुळे महायुती इथून कुणाला उमेदवारी देईल. हा मोठा प्रश्न आहे… पण आवळे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि आघाडीची मिळणारी साथ पाहता यंदाही त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत…

नववा मतदारसंघ आहे तो इचलकरंजीचा….

अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रकाश आवाडे हे इथले विद्यमान आमदार. काँग्रेस पक्षाकडून आवाडे सलग तीन टर्म आमदार राहीले. पण २०२९ मध्ये ताराराणी आघाडीकडूनच निवडणुक लढवत ते अपक्ष आमदार झाले… भाजपच्या सुरेश हाळवणकर यांनी २००९ ते २०१९ मध्ये आवाडे यांच्या राजकारणाला आवर घातला होता. पण ही कोंडी त्यांनी २०१९ मध्ये फोडलीच.. सध्या आवाडे येणाऱ्या विधानसबेला कुणाकडे जातील हे आत्ताच सांगता येणारं नसलं तरी आमदारककीचा चेहरा म्हणून इचलकरंजीकर त्यांच्याच नावाला पसंती देतील…

आता पाहुयात शेवटचा दहावा मतदारसंघ तो म्हणजे शिरोळचा…

शिवसेनेचे उल्हास पाटील हे सध्या शिरोळचे विद्यमान आमदार आहेत. चार निवडणुक चार वेगळे आमदार म्हणून शिरोळची ओळख. ऊसपट्टा म्हणून ओळख असणाऱ्या शिरोळच्या जनतेनं राजू शेट्टी, आप्पासाहेब पाटील. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि उल्हास पाटील अशा लोकप्रतिनीधींना निवडून दिलं… स्वाभिमानीची या पट्ट्यात ताकद आहे… पण शिवसेनेनं इथे चांगला जम बसवला. सध्याचे विद्यमान आमदार उल्हास पाटील हे ठाकरे गटात असल्याने तेच इथून महाविकाास आघाडीचे उमेदवार असतील. तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून राजेंद्र पाटील निवडणुकीच्या मैदानात असण्याची शक्यता आहे. हातकणंगलेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने याच मतदारसंघात येत असल्याने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असले..तर असे आहेत कोल्हापुरातील विधानसभेचे संभाव्य दहा आमदार.. बाकी कोल्हापुरात कुठला उमेदवार कोणत्या जागेवरुन निवडून येईल? याबद्धल तुमचाा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.