अबब! दांडपट्ट्याने कापले तब्बल ४००० लिंबू; कोल्हापूरच्या गफूरने केला विक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधत शांतीदूत मर्दानी आखाड्याचा खेळाडू गफूर मुजावर याने दांडपट्ट्याने सपासप वार करत ४००० लिंबू कापण्याचा विक्रम नोंदवला. यासाठी त्याला एक तास ५८ मिनीटांचा कालावधी लागला. सकाळी साडेनऊ वाजता पद्मावती मंदिराच्या पिछाडीस एनसीसी रेसकोर्स रस्त्यावर याचे आयोजन केले होते.

यादवनगर येथे रहात असलेला गफूर गेली सात वर्षे मर्दानी कलेचे प्रशिक्षण घेत असून तो गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. सामाजिक कार्यकर्ते शेखर जाधव, द्योजिका विद्या माने, उद्योजक प्रशांत सुतार, अमित जाधव यांच्या उपस्थितीत उपक्रमास सुरुवात झाली. हलगी, घुमक्याच्या तालावर रस्त्यावर मांडलेले लिंबू दांडपट्ट्याने सपासप कापण्यास गफूरने सुरुवात केली.

उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. टाळ्या वाजवून आणि घोषणा देत सहकारी त्याला प्रोत्साहन देत होते. सुमारे दोन तासांनंतर गफूरने अखेरचा लिंबू कापून विक्रमाची नोंद केली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, भारतमाता की जय, वंदे मातरमचा जयघोष करण्यात आला. आखाड्याचे संस्थापक सूरज केसरकर व कार्याध्यक्ष अतुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी, मित्र परिवार, पालकांनी प्रोत्साहन दिले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

सरन्यायाधीशांनी भाजपाला फटकारलं; राजकारणासाठी कोर्टाचा वापर करू नका!

भीमा – कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार?

नागपूरमध्ये १९ वर्षीय मुलीवर बलात्कार, क्रूरतेमध्ये निर्भया कांडाची पुनरावृत्ती

Leave a Comment