कोल्हापूर -पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु ; IT अभियंत्यांचा प्रवास होणार सुखकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मागच्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु व्हावी अशी कोल्हापूरकरांची मागणी होती. ही मागणी आता अखेर पूर्ण झाली असून कालपासून म्हणजेच 16 सप्टेंबर 2024 पासून कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. मूळ कोल्हापूरचे असलेले मात्र कामानिमित्त पुण्यात स्थियक झालेल्या हजारो IT मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना या ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे. सध्या बाय रोड प्रवास करायचा झाल्यास कोल्हापूर -पुणे मार्गावर रस्त्याची कामे चालू असल्यामुळे पाच तासांच्या प्रवासाला 6 ते 7 तास लागतात. शिवाय या मार्गावर ट्राफिक जॅमची समस्या सुद्धा नित्याचीच झाली आहे. त्यामुळे जलद आणि आरामदायी प्रवास म्हणून ‘वंदे भारत एक्सप्रेस’चा पर्याय अधिक महत्वाचा ठरणार आहे.

सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून या गाडीला ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवण्यात आला या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सिमुना हे देखील उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना खासदार महाडिक म्हणाले वंदे भारत आता कोल्हापूर ते पुण्यापर्यंत धावत असली तरी लवकरच मुंबईपर्यंत सुरू केली जाणार आहे करवीर बास यांनी उपस्थित रहावे यावेळी माझी नगरसेवक सत्यजित कदम भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सदस्य राहुल चिकोडेल रूपा राणी निकम आदी उपस्थित होते

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत एक्सप्रेस सोमवार गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणार आहे. तर दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी ही गाडी पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. तर प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवार दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी ही वंदे भारत एक्सप्रेस पुण्याहून सुटणार आहे आणि ही गाडी संध्याकाळी सात वाजून 40 मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचणार आहे.

या स्थानकांवर घेईल थांबे

कोल्हापूर ते पुणे वंदे परत एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

आसनक्षमता

या गाडीला एकूण आठ डबे असून त्यामध्ये सात चेअर कार आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास आहे. पाच डब्यात प्रत्येकी 78 आसन क्षमता आहे. तर रेल्वे इंजिन जवळच्या दोन्ही डब्यांमध्ये प्रत्येकी 44 आसन क्षमता आहे. तर एक्झिक्यूटिव्ह क्लास साठी 52 आसन क्षमता आहे. एकूण आसन क्षमता 530 इतकी आहे

किती आहे तिकीट ?

कोल्हापूर पुणे आणि पुणे कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटाबद्दल सांगायचं झाल्यास प्रति व्यक्ती ५६० रुपये व एक्झिक्यूटिव्ह क्लास साठी 1135 असे तिकीट दर आहेत. या तिकीट दरातच चहा जेवण आणि पाणी देखील उपलब्ध केलं जाणार आहे