Kolhapur- Pune Vande Bharat Express | कोल्हापूर ते पुणे या दोन शहरांदरम्यान अनेक नागरिक प्रवास करत असतात. त्यामुळे या दोन शहरांदरम्यान एक्सप्रेस चालू व्हावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून चालू होती. अशातच आता कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता येत्या सोमवारपासून म्हणजेच 16 सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही एक्सप्रेस आठवड्यातून केवळ तीन दिवस धावणार आहे. या एक्सप्रेसचा 16 तारखेला शुभारंभ होणार आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी देखील घेण्यात आलेली आहे. आता या चाचणीनंतर ही रेल्वे रुळावर धावण्यासाठी सज्ज झालेली आहे.
या एक्सप्रेसची चाचणी करण्यात आली, त्यादरम्यान कोल्हापूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला नक्की किती वेळ लागतो? तसेच रेल्वेवर जाताना इतर काही अडथळे येत आहेत का? या सगळ्याची चाचणी घेण्यात आली. आठवड्यातून केवळ तीन वेळा ही रेल्वे धावणार आहे. सोमवारी रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना हे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर या रेल्वेला हिरवा कंदील दाखवणार आहेत. कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत (Kolhapur- Pune Vande Bharat Express) एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी धावणार आहे. ही रेल्वे कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल, तर दुपारी ती दीड वाजता पुण्यात पोहोचेल. तसेच पुण्याहून ही गाडी बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी 2 वाजता सुटेल आणि संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूर स्थानकात येणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना पुणे ते नाशिक असा प्रवास करायचा आहे. त्यांच्यासाठी हा एक सोयीचा पर्याय आहे.
वंदे भारत एक्सप्रेसला किती तिकीट असणार | Kolhapur- Pune Vande Bharat Express
कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे. तसेच कोल्हापूर पुणे या प्रवासांचे दर चेअर कारसाठी 1160 रुपये आहे. तसेच एक्झिक्युटिव्ह साठी 2005 रुपये एवढे आहे. तसेच वंदे भारत कोल्हापूर ते पुणे या मार्गावर 16 सप्टेंबर पासून धावणार आहे. या एक्सप्रेससाठी कोल्हापूरकरांना खूप वाट पाहावी लागलेली आहे. तसेच खूप संघर्ष देखील करावा लागला आहे. परंतु कोल्हापूरकरांसाठी ही एक चांगली बातमी आहे.