Kolhapur : मुंबई म्हंटल की चौपाटी आठवते. कोकण म्हंटले की समुद्रकिनारे नजरेसमोर येतात. ज्या प्रदेशांना सुंदर समुद्रकिनारे (Kolhapur) लाभले आहेत ते खरंच भाग्यशाली आहेत. ज्यांच्याकडे हे निसर्ग सौन्दर्य नाही त्यांचं काय ? अशा लोकांना दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. पण कोल्हापूर (Kolhapur) हे असं परिपूर्ण ठिकाण आहे जिथे निसर्ग सौन्दर्याचे वरदान लाभले आहे. इथे समुद्र नसले तरी रंकाळा तलावाच्या रूपाने इथे चौपाटीचा फील नक्की मिळेल. चला आजच्या लेखात जाणून घेऊया कोल्हापुरातील रंकाळा तलावाबाबत…
कोल्हापूर (Kolhapur) म्हंटल की सर्वात आधी महालक्ष्मी मंदिर, जोतिबा, शाहू नगरी, तांबडा -पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल , असे बरेच काही बोलता येऊ शकेल. पण कोल्हापूरचं नाव घेतलं की रंकाळ्याला विसरून चालणारच नाही. (Kolhapur) महालक्ष्मी मंदीराच्या पश्चिम दिशेला, रंकाळा तलाव आहे, सायंकाळी फिरण्यासाठी करमणुकीचे लोकप्रिय ठिकाण आहे. हा तलाव राजर्षी शाहु महाराज यांनी बांधला. ह्या तलावाच्या सभोवताली चौपाटी व बाग आहे. याच्या मागच्या बाजुला शालिनी पॅलेस आहे. बोटीत बसून तुम्ही रंकाळा विहार करू शकता.
रंकाळ्याचा इतिहास (Kolhapur)
रंकाळा तलावाच्या जागी पूर्वी एक भली मोठी दगडाची खाण होती. या खाणीतूनच महालक्ष्मी मंदिरासाठी दगड आणण्यात आले. असे या तलावाबाबत सांगितले जाते. राजा गंडरादित्य याने महालक्ष्मी मंदिरासह 360 जैन मंदिरे बांधली त्यासाठी या खाणीतूनच दगड आणण्यात आले होते. देवीच्या वरदानाने हा तलाव निर्माण झाला अशी देखील अख्यायिका आहे. इ.स. 800 ते 900 च्या कालावधीत (Kolhapur) येथे मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले. या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला असे स्थानिक सांगतात. रंकाळा तलावाचे विकासकाम राजर्षी शाहु महाराज यांनी केले. रंकाळा तलाव अडीच मैलांवर पसरलेला असून त्याची मध्यभागी खोली 35फूट आहे. एव्हढेच नई तर या तलावामध्ये एक ऐतिहासिक मंदिर देखील आहे. या मंदिरात शिव आणि नंदी आहेत.