उन्हाळी सुट्ट्यांचा काळ जवळ येत असताना रेल्वे प्रवाशांची संख्या वाढणार आहे. गर्दी आणि तिकीट मिळवण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने एक नवीन समर स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापूर ते पुणे, आणि पुढे कटिहार पर्यंतचा प्रवास वेगवान होईल. चला, जाणून घेऊया या ट्रेनच्या वेळापत्रकाबद्दल आणि मार्गावरील महत्वाच्या स्थानकांची माहिती.
कोल्हापूर ते कटिहार समर स्पेशल ट्रेन
गाडी क्र. 01405
प्रवासाचा कालावधी: 6 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025
प्रस्थान: प्रत्येक रविवारी, 9:35 AM कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून
पहुच: तिसऱ्या दिवशी, 6:10 AM कटिहार स्थानकावर
फेऱ्या: 4 साप्ताहिक फेऱ्या
कटिहार ते कोल्हापूर समर स्पेशल ट्रेन
गाडी क्र. 01406
प्रवासाचा कालावधी: 8 एप्रिल 2025 ते 29 एप्रिल 2025
प्रस्थान: प्रत्येक मंगळवारी, 6:10 PM कटिहार स्थानकावरून
पहुच: तिसऱ्या दिवशी, 3:35 PM कोल्हापूर स्थानकावर
फेऱ्या: 4 साप्ताहिक फेऱ्या
गाडी थांबणारे प्रमुख स्थानक
महाराष्ट्रातील स्थानक -मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ तर भुसावळनंतर गाडी खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सटाणा, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगरिया, नौगाचिया स्थानकांवर थांबणार आहे.
समर स्पेशल ट्रेनने प्रवासाची गती वाढवली आहे, त्यामुळे कोल्हापूर ते पुणे आणि कटिहार पर्यंत प्रवास करतांना अधिक सोयीचा आणि जलद अनुभव मिळणार आहे. ही विशेष ट्रेन प्रवाशांना आरामदायक आणि वेगवान प्रवासाची सुविधा देईल, ज्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.