हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Konkan Railways – रेलवे प्रशासन नेहमीच प्रवाशांच्या सोयीसाठी अन सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष सेवा पुरवत असते. होळीच्या अन शिमग्याच्या सणानिमित्य अधिक 34 विशेष गाड्या धावणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना मोठी खुशखबर मिळाली आहे. या गाड्या एलटीटी, पनवेल आणि इतर ठिकाणांहून कोकण आणि इतर मार्गांवर धावणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुलभ अन आरामदायी होण्यास मदत होईल. तर या विशेष रेल्वे (Konkan Railways) गाड्या कधी पासून धावणार , त्या कुठल्या ठिकाणाहून सुटणार हे सर्व जाणून घेऊयात , आजच्या बातमीत .
प्रवासासाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार (Konkan Railways) –
नागरिकांना मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस अन पनवेलहून विशेष सेवा प्रदान केली जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने (Konkan Railways) हि सेवा 10 ते 25 मार्च या कालावधीत देणार असल्याचेही सांगितले आहे. यासोबतच कोकणासाठी एलटीटी-मडगाव 17 व 23 मार्चला विशेष गाड्या धावणार आहेत. पनवेल-मडगाव 15 व 22 मार्चला सुटेल आणि पनवेल-चिपळूण मेमू अशा 8 फेऱ्या हि रेल्वे 13 ते 16 मार्चपर्यंत करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. त्याचप्रमाणे, पुणे-दानापूर-पुणे , मुंबई-बनारस, मऊ, दानापूर, मडगाव, पुणे-हिसार, दानापूर, मालदा टाउन आणि कलबुर्गी-बेंगळुरू मार्गांवरही विशेष रेल्वे धावणार आहेत.
एसटी महामंडळाची मोठी घोषणा –
रेल्वेसोबत आता जे लोक एसटी महामंडळाच्या गाड्यांनी प्रवास करतात , त्यांच्यासाठीही महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक 195 एसटी गाड्या चालणार असल्याची घोषणा केली आहे. 17 मार्चपर्यंत या विशेष गाड्या मुंबई, ठाणे, अन पालघर जिल्ह्यातून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध बस स्थानकावरून धावणार आहेत . यासोबतच गुहागर, चिपळूण, खेड, कणकवली, रत्नागिरी, गणपतीपुळे अशा ठिकाणी अधिक गाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. सणाच्या आनंदात प्रवास करत असताना, या विशेष गाड्या आणि एसटी सेवांमुळे प्रवाशांना आरामदायक आणि सोयीस्कर यात्रा अनुभवता येईल.
प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा –
उन्हाळ्यातील प्रचंड गर्दी आणि प्रवासाच्या त्रासावर मात केली जाऊ शकेल. मध्य रेल्वेने (Konkan Railways) या विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊन, राज्यातील पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातून कोकण आणि इतर भागांतील संपर्क वाढवण्यात मदत होईल आणि पर्यटन क्षेत्रातही प्रगती होणार आहे.




