Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Konkan Railway Bharti 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Konkan Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता कोकण रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 42 जागा आहेत. त्यामुळे या जागानुसार आता अर्ज मागविण्यात झालेले आहे. ही भरती थेट मुलाखतीद्वारे आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ही 5, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 ही ठरवण्यात आलेली आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती | Konkan Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – AEE करार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल, ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक /इलेक्ट्रिकल, इंजिनिअर तांत्रिक सहाय्यक/ सिव्हील, डिझाईन असिस्टंट /इलेक्ट्रिकल, तांत्रिक सहाय्यक /इलेक्ट्रिकल
  • पदसंख्या – 42 जागा.
  • नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 5 10 12 14 19 21 जून
  • मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्यूटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड जवळ सिवूड्स रेल्वे स्टेशन सेक्टर 40

मासिक वेतन

  • AEE/करार – 56 हजार 100 रुपये
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्य / इलेक्ट्रिकल – 44,900 रुपये
  • ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल – 35,400 रुपये
  • जुनिअर जागतिक सहाय्यक / सिव्हिल- 35, 400 रुपये
  • डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकल – 35,400 रुपये
  • तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल – 25, 500 रुपये

महत्वाचे कागदपत्र

  • पात्रतेच्या पुराव्यामध्ये प्रमाणपत्राची प्रत
  • जन्मतारखेच्या पुराव्याची प्रत
  • माजी सैनिकांसाठी दाव्याच्या समर्थनार्थ सेवा प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  • व्यावसायिक अनुभव अंतिम सेवा व इतर संबंधित कागदपत्रांची प्रत

निवड प्रक्रिया

  • भरती अंतर्गत मुलाखती द्वारे निवड केली जाईल.
  • उमेदवारांनी तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहणे गरजेचे आहे.
  • मुलाखतीला येताना सर्व कागदपत्र सोबत असणे गरजेचे आहे.
  • अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचावी.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा