Konkan Railway : कोकण रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून वसूल केले 2 कोटी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Konkan Railway | भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. अनेकजण छोट्या मोठ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. त्यातच काही जण असे असतात की, विना तिकीट प्रवास करतात. त्यामुळे अश्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे नेहमीच तत्पर असते. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून काही प्रमाणात दंड आकारला जातो. त्यातुनच कोकण रेल्वेने एका महिन्यात 2 कोटी 5 लाख 52 हजार 446 रुपये दंड वसुल केला आहे.

7 हजार 13 प्रकरणातून वसुल केली रक्कम

कोकण रेल्वेने (Konkan Railway) विना तिकीट प्रवास करणार्यांची शोध मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सातत्याने चालू असते. त्यामुळे एका महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या ही तब्बल 7 हजार 13 एवढी होती. या प्रवाश्यांकडून हा दंड वसुल करण्यात आला आहे. अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.

कोकण रेल्वेकडून करण्यात आले आवाहन – Konkan Railway

रेल्वेने प्रवास हा भारतीयांचा खिशाला परवडणारा व सोयीस्कर प्रवास आहे. ज्यामुळे अनेकजण यास पसंती देतात. मात्र एवढ्या सुविधा देऊनही काही प्रवासी पैसे असताना देखील रेल्वेने फुकट प्रवास करण्याचे धाडस करतात. त्यामुळे अश्या प्रवाश्यांना पकडण्यासाठी रेल्वे मोहीम चालवते. त्यातून अनेक प्रकार समोर येतात. त्यामुळे अश्या प्रवाश्यांवर दंड आकरला जातो. कोकण रेल्वेने (Konkan Railway) प्रवाश्यांच्या सुखकर प्रवासाठी अश्या प्रवाश्यांना तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. विना तिकीट प्रवास करणार्यांना शोधण्यासाठी रेल्वेकडून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. ती जारी आहे. यातून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे हे समोर येत आहे. त्यामुळे ही मोहीम जारी ठेवण्यात आली आहे.