Konkan Railway : कोकणवासियांसाठी खुशखबर!! आजपासून धावणार दिवाळी विशेष ट्रेन; काय आहे रूट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी म्हंटल की वाहणांना होणारी गर्दी आणि प्रत्येकाला बाहेरगावी जाण्याची घाई डोळ्यासमोर येऊन उभा ठाकते. दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं यासाठी लहानापासून ते मोठ्यापर्यन्त सर्वचजण उत्सुक असतात. त्यासाठी विविध प्लॅन आपण ठरवून ठेवलेले असतात. सणासुदीच्या या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वेने (Konkan Railway) कोकणसाठी दिवाळी विशेष ट्रेन आजपासून सुरु केली आहे. गुजरात सुरत जवळची उधना ते मंगळूरू ही गाडी कोकण मार्गावर धावणार आहे.

3 नोव्हेंबर पासून चालवली जाणार गाडी- Konkan Railway

गाडी नंबर 09057/ 09058 ही सुरतजवळील उधना ते मंगळूरु जंक्शन पर्यंत चालवली जाणार आहे. उधना ते मंगळूरू अशी धावणारी ही गाडी आजपासून म्हणजेच 3 नोव्हेंबर पासून या मार्गांवर धावणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस 1 जानेवारी पर्यंत धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रेन रत्नागिरी, वलसाड, वापी, वसई रोड, मुकांबिका रोड बयंदूर, संगमेश्वर रोड, कुडाळ, सावंतवाडी, भटकळ, पनवेल रोड, भिवंडी रोड, रोहा, माणगाव, कानकोन, कारवार, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, खेड, चिपळूण, सावर्डी, संगमेश्वर रोड , कुमटा, मुद्देश्वर, थिविम, करमाळी या सारख्या विविध ठिकाणा वरून जाणार आहे.

दिवाळीनंतरही धावणार ही ट्रेन-

दिनांक 3,5,10,12,17, 19,24,26 पर्यंत या गाडीच्या फेऱ्या (Konkan Railway) होणार आहेत. एवढेच नव्हे तर ही गाडी दिवाळीनंतरही म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत आठवड्यातून दोन वेळेस धावणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांना याचा फायदाच होणार आहे. तसेच पर्यटनासही याचा फायदा होणार आहे. त्यामुळे गाडीची विशेषता ही अधिक असल्याचे मानले जात आहे.