Konkan Railway : महत्वाची बातमी ! कोकण रेल्वेमार्गावर ‘या’ दिवशी मेगाब्लॉक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Konkan Railway : तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. उद्या म्हणजे 23 फेब्रुवारीला रेल्वे विभागाकडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

देखभालीसाठी मेगाब्लॉक (Konkan Railway)

रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावरच्या सावर्डे रत्नागिरी विभागाच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी 23 फेब्रुवारीला सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

या गाड्यांचा परिणाम मुख्यतः दोन रेल्वे गाड्यांवर होणार आहेत या ब्लॉकमुळे एरणाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस (Konkan Railway) 22 फेब्रुवारीला मडगाव रत्नागिरी विभागात एक तास 45 मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

याशिवाय तिरुमेलवली गांधीधाम एक्सप्रेस एक तास 20 मिनिटं थांबवण्यात येणार आहे. (Konkan Railway) या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी असा आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

कोकण रेल्वे

कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील मध्य रेल्वेवरील रोहा स्थानक येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. 26 जानेवारी 1998 रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी 741 किमी आहे.