Konkan Railway : कोकण रेल्वेची प्रवाशांसाठी खास भेट; ‘या’ मार्गावर धावणार विशेष गाड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Konkan Railway : राज्यातल्या इतर भागातून कोकणाला जोडणारी कोकण रेल्वे ही कोकणवासियांसाठी आणि कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप महत्वाची भूमिका बजावते. मुंबई आणि आसपासच्या भागात मोठ्या संख्येने कोकणवासीयांचे वास्तव्य आहे. विशेषतः सुट्ट्यांचे दिवस आणि सण उत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. शिमगा , गणशोत्सव उन्हाळी सुट्टी अशा काळामध्ये रल्वेकरिता प्रवाशांना अधिच बुकिंग करावे लागते. सध्या उन्हाळी सुट्टी सुरु झाल्यामुळे कोकणात पर्यटन आणि सुट्टीसाठी (Konkan Railway) जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वेला होताना दिसते आहे. प्रवाशांची हीच गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी खास सोय केली आहे.

आता पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी या मार्गावर विशेष गाड्यांची सोय कोकण रेल्वे मार्फत करण्यात आलेली आहे. सध्या कोकण रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता ही गर्दी विभाजित करण्यासाठी कोकण रेल्वे (Konkan Railway) कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्या 6 जून पर्यंत निर्धारित वेळेमध्ये धावणार आहेत.

मडगाव पनवेल मार्ग

मडगाव ते पनवेल गाडी क्रमांक 01158 ही गाडी रेल्वे 6 मे पासून म्हणजेच आजपासून सकाळी निर्धारित स्थानकांमधून सुरू करण्यात आलेली आहे सोमवारी ही गाडी पनवेलला सायंकाळी 6:50 वाजता पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक 01157 ही गाडी 8 मे रोजी पहाटे 4 वाजता पनवेल होऊन निघून त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मडगाव ला पोहोचणार आहेत. या गाडीमध्ये 10 स्लीपर,8 जनरल आणि 2 एल एल आर कोच असतील. ही गाडी करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल या स्थानकांवर (Konkan Railway) थांबेल.

सावंतवाडी मार्ग (Konkan Railway)

गाडी क्रमांक 01159 पनवेल – सावंतवाडी रोड ही रेल्वे 6 मे रोजी रात्री 8 वाजचा पनवेलहून निघून दुसऱ्या दिवशी निर्धारित स्थानकात सकाळी 6 वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक 01160 सावंतवाडी रोड ते पनवेल ही गाडी 7 मे रोजी दुपारी 4 वाजता पनवेल दिशेनं प्रवास सुरु करणार असून, दुसऱ्या दिवशी 3 वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेल सावंतवाडी मार्गावरील रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर (Konkan Railway) ही गाडी थांबेल.