Konkan Railway : राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मागच्या दोन दिवसांमध्ये कोकण विभागात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याचा परिणाम कोकण रेल्वेवर झाला असून गोव्यातील पेडणे येथील रेल्वे बोगद्यामधून पाणी पाहत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, तेजस तसेच जनशताब्दी सह आज बुधवार दिनांक 10 जुलै रोजी धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही आज कोकण रेल्वे प्रवास करणार असाल तर आधी रेल्वेच्या या सूचना पहा आणि मगच बाहेर पडा.
मागचे दोन दिवस कोकणामध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्यामुळे याचा परिणाम रेल्वेवरही झाला आहे. कोकण रेल्वेच्या कारवार विभागातील गोव्याच्या हद्दीत समाविष्ट असणाऱ्या मडुरे ते पेडणे दरम्यान रेल्वेच्या (Konkan Railway) भुयारी मार्गामध्ये पाणी वाहू लागलं. दिनांक 9 जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा सर्व प्रकार निदर्शनास आला आणि त्यानंतर सुरुवातीला काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता ट्रॅक ऑफ फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या मार्गावरची वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र रात्री देखील मुसळधार पाऊस असल्यामुळे आज दिनांक 10 जुलै रोजी पहाटे दोन वाजून 59 मिनिटांचा सुमारास पेडणे बोगदा मधून मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागला त्यामुळे प्रवासांच्या सुरक्षे खातच खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वे कडून या मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या रद्द (Konkan Railway) करण्यात आल्या आहेत. याबाबतची नोंद सर्व प्रवाशांनी घ्यावी असा आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
नक्की काय घडले? (Konkan Railway)
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस (Konkan Railway) सावंतवाडी पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस ,दिवा एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगला एक्सप्रेस चा मार्ग बदलून तो पनवेल -लोणावळा -पुणे -मिरज- लोंढा- मडगाव असा करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही कोकण रेल्वेचा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी पहा आणि मगच बाहेर पडा.