Konkan Tourist Places : यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाण्याचा प्लान करताय? ही 5 ठिकाणं आहेत बेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचा सिजन असून गर्मीच्या या दिवसांत उन्हाच्या कडाक्यापासून आपली सुटका करून घेण्यासाठी कोकणच्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्याचा विचार आपल्यातील अनेकजण करत असतात. कोकणाला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असेही म्हंटल जातं. भव्य असा समुद्रकिनारा, शुद्ध हवा, हिरवागार निसर्ग यामुळे कोकणात मन प्रसन्न होऊन जाते. त्यातच, उन्हाळा हा सुट्टीचा काळ असल्यामुळे सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी तुम्ही सुद्धा कोकणात जाण्याचा प्लॅन करत असाल किंवा भविष्यात कधी करणार असाल तर आज आम्ही तुम्हांला कोकणातील अशी 5 ठिकाणे (Konkan Tourist Places) सांगणार आहोत ज्याठिकाणी वेळ घालवून तुम्ही सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

Diveagar Beach

1) दिवेआगर बीच- Diveagar Beach

मुंबईपासून सुमारे 170 किमी अंतरावर रायगड जिल्ह्यात वसलेले दिवेआगर बीच हे कोकणातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी तुम्हांला घोडेस्वारी, वॉटर स्पोर्ट्स, एटीव्ही राइड्स यासारख्या विविध प्रकारच्या गोष्टींचा आनंद घेता येतो. दिवेआगर समुद्रकिनारा त्याच्या मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी तसेच पॅरासेलिंग, सर्फिंग आणि स्कूबा डायव्हिंग यांसारख्या अनेक खेळांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षी याठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी पहायला मिळते.

Tamhini Ghat

2) ताम्हिणी घाट- Tamhini Ghat

पुणे आणि कोकण प्रदेशात वसलेला ताम्हिणी घाट हे सुद्धा पर्यटनाचे आकर्षक असं ठिकाण आहे. घाटातील हिरवागार परिसर, डोंगर माथ्यावर आलेले ढग, नागमोडी वळणे आणि मुळशी धरण पाहून नक्कीच तुमचं मन तृप्त होईल. इथला निसर्गरम्य परिसर, तलाव, जंगले, घाट आणि धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात.

Malvan

३) मालवण – Malvan (Konkan Tourist Places)

कोकणातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे मालवण, कडक उन्हापासून सुटका करून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही मालवणला जा. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ठिकाण मन मोहित करणाऱ्या समुद्रकिनाऱ्यासाठी लोकप्रिय आहे. इतर बीचच्या तुलनेत याठिकाणी लोकांची जास्त गर्दी नसल्यामुळे तुम्हाला शांततापूर्ण वातावरणाचा अनुभव घेता येतो. मालवण बीचवर नारळी, पोफळीच्या बागा, बांबू, सुपारीची झाडे पहायला मिळतात.

Kashid Beach

4) काशीद बीच Kashid Beach-

अलिबागपासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेले काशीद बीच महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन (Konkan Tourist Places) स्थळ आहे. निळाशार समुद्र, पांढरी वाळू, डोळ्याचं पारणं फेडणारा निसर्ग यामुळे काशीद बीचवर दरवर्षी लाखो पर्यटक येतात आणि आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेतात. या बीचवर तुम्ही जल क्रीडा सुविधाचा आनंद घेऊ शकता. याशिवाय समुद्रकिनारी हॉटेल्स आणि राहण्याची सोयही असल्यामुळे हा बीच पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

Vengurla

5) वेंगुर्ला- Vengurla

प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे गाव असलेलं वेंगुर्ला हे अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. मुंबईपासून वेंगुर्ला जवळपास 520 किलोमीटर अंतर आहे. याठिकाणी असलेल्या समुद्रकिनारी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. वेंगुर्ला समुद्रकिना-याला सभोवताली टेकड्या पाहायला मिळतात. तसेच याठिकाणी मासेमारीचे प्रमाणही जास्त आहे.