कोरेगावला तहसिल, पोलिसांच्या कार्यालयात पाणी घुसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरेगाव शहरात सायंकाळी जवळपास दीड ते पावणे दोन तास पडलेल्या जोरदार पावसामुळे कोरेगाव तहसील व पोलीस प्रशासनाच्या कामकाज चालणाऱ्या विविध कार्यालयीन खोल्यात पावसाचे पाणी घुसले. शासकीय कार्यालय परिसरात गुडघा भर पाणी साचले होते. तर कराड शहरातही दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नव्या प्रशासकीय इमारतीमधील पार्किंगमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली.

अति पावसामुळे कोरेगाव कार्यालयातील कामकाज जवळपास ठप्प झाले. पावसाने उघडीप दिल्यानंतर पावसाचे गढूळ पाणी पाणी बाहेर काढण्यासाठी एकच धावपळ सुरू आहे. कोरेगाव शहरात सायंकाळी पावणे चारच्या सुमारास जोरदार पावसाने सुरुवात केली जवळपास दीड ते पावणे दोन तास पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सेतू कार्यालय, निवडणूक शाखा, नगर भुमापन कार्यालय, वित्त विभाग, उपकोषागार कार्यालय या सर्व विभाग कार्यालयमध्ये गुडघा भर पाणी साचले होते.

संबंधित महसूल व पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारीचे उपायोजना केल्याने कागदपत्रांचे कोणतीही नुकसान झाले नाही. मात्र खोल्या खोल असल्याने बाहेर साचलेले पाणी आत जाण्याचा संभव असल्याने असणारे कागदपत्र वर उचलून ठेवण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे कराड प्रशासकीय इमारतीत प्रांत, तहसिल, पुरवठा यासह अनेक विभागाची कार्यालये आहेत. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर ये- जा चालू असते. नव्या इमारतीत पावसाचे पाणी पार्किंगमध्ये साचत असल्याचे दिसून येत आहे.