FD Rates : खुशखबर!! ‘या’ बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही सुद्धा बँकेत (Bank) गुंतवणूक करून खात्रीदायक रिटर्न मिळवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या कोटक महिंद्राने (Kotak Mahindra Bank) आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. 0.25 टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. नुकतंच RBI ने रेपो रेट मध्ये वाढ केल्यांनतर कोटक महिंद्रा बँकेने FD वरील व्याजदर वाढवले आहेत. शुक्रवारपासून बँकेचे नवे व्याजदर लागू झाले आहेत. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 2 ते 5 कोटींच्या एफडींना लागू होते.

यानुसार, 15 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या ठेवींवर 7.25 टक्के आणि 12 महिने 25 दिवस ते 2 वर्षांच्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 7.10 टक्के व्याज दिले जाईल. आरबीआयने व्याजदरात वाढ केल्याने, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या सेविंग वर जास्त रिटर्न देण्याचा निर्णय घेतला आहे असं बँकेचे प्रमुख विराट दिवाणजी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

कोटक महिंद्रा बँक 180 दिवसांपासून ते 364 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.50 टक्के व्याजदर देत आहे. 364 दिवसांच्या FD वर सामान्य नागरिकांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याजदर मिळत आहे. 365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 6.90 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.40 टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच 12 महिने 25 दिवसांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर कोटक मंहिद्रा बँकेकडून सामान्य ग्राहकांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर मिळेल.

नियमित ग्राहकांना 6.25 टक्के आणि 364 दिवसांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. 365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वर नियमित ग्राहकांना 6.90 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.40 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. त्याच वेळी, 12 महिने 25 दिवसांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर, ते नियमित ग्राहकांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर देत आहे.